esakal | अनुकंपाच्या नियुक्तींसाठी ऑगस्टमध्ये शिक्षण दरबार : मंत्री बच्चू कडू
sakal

बोलून बातमी शोधा

Bcchu Kadu

अनुकंपाच्या नियुक्तींसाठी ऑगस्टमध्ये शिक्षण दरबार : बच्चू कडू

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा नोकरीत असताना आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांकडून अनुकंपधारकांना नियुक्ती देण्यास ठेंगा दाखविला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तिपत्रे द्यावीत, असे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नाशिक येथे ऑगस्ट महिन्यात शिक्षण दरबार घेणार असल्याचे त्यांनी शिक्षकसेनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले. (Education court in August for compassionate ground appointments af teachers says bhacchu kadu)

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर सोनजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात राज्यमंत्री कडू यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हा परिषदेत प्रतीक्षा यादीनुसार अनेकांना अनुकंपातत्त्वावर हक्काची नोकरी मिळाली असली तरी खासगी शिक्षण संस्था मात्र अनुकंपधारक उमेदवारांना नोकरी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदींनी नेमणूक आदेश देण्याबाबतचे पत्र देऊनही नेमणूक होत नसल्याने उमेदवारांची फरपट होत आहे. शेकडो उमेदवार शासकीय सेवेत अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळेल, या आशेवर आहेत.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

नियुक्तीची अशी आहे तरतूद

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलाला किंवा कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचाऱ्यास कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू झालेल्यांची वेगळी सूची करण्यात यावी, असे सरकारचे निर्देश आहेत. राज्य सरकारच्या ‘क’ आणि ‘ड’ गटातील पदावर सरळ प्रवेश भरतीने ही नियुक्‍ती करता येते. याकरिता निवड मंडळाचा सल्ला किंवा परवानगी घेण्याची गरज नाही.

जिल्ह्यात अनेक विभागांमध्ये अनुकंपातत्त्वावरील प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांत, खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शेकडो उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. उमेदवारांमध्ये नैराश्‍य वाढत असून, खासगी संस्थांमधील अनुकंपा भरतीप्रक्रिया रखडल्याने प्रतीक्षायादी वाढत आहे.

(Education court in August for compassionate ground appointments af teachers says bhacchu kadu)

हेही वाचा: नाशिक विभाग अजूनही सर्वदूर पावसाच्या प्रतीक्षेत

loading image