Nashik : माजी महापौरांच्या प्रभागात होणार 30 कोटींचा रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ex Mayor Satish Kulkarni

Nashik : माजी महापौरांच्या प्रभागात होणार 30 कोटींचा 'ड्रीम प्रोजेक्ट'

नाशिक : माजी महापौर सतीश कुलकर्णी (Satish kulkarni) यांच्या प्रभागात इंदिरानगर ते पुणे महामार्गापर्यत सुमारे ३० कोटीचा रस्ता होणार आहे. माजी महापौर कुलकर्णी यांचा ड्रीम प्रोजेक्ट (dream Project) म्हटला जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे साधारण वर्षभरात हा रस्ता पूर्ण होण्याची आशा आहे. (30 crore rupees road to be constructed in ex mayor Satish kulkarnis ward Nashik News)

इंदिरानगर बोगद्यापासून तर नाशिक पुणे महामार्गावरील डीजीपीनगर फेम व आंबेडकरनगर दरम्यान हा रस्ता नाशिक रोड ते सिडको यांना जोडण्यासाठी समांतर रस्ता आहे. इंदिरानगर ते पुणे महामार्गाला जोडणाऱ्या मॉडेल रोडच्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याने हा रोड लवकरच पूर्णत्वास येणार आहे. येत्या वर्षभरात या रोडचे काम पूर्ण होण्याच्या आशा आहेत. इंदिरानगर बोगदा ते पुणे महामार्गाला (Pune Highway) हा रस्ता जोडणारा ठरणार आहे. सध्या हा रस्ता तयार आहे. मात्र आता नव्याने त्याचे रुंदीकरण करून रस्ता होणार आहे. प्रस्तावित रस्ता ३० मीटर रुंदीकरणासह विविध कामे करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत केला महत्‍वपूर्ण बदल

सिडकोत इंदिरानगरला मुंबई- आग्रा महामार्ग ते नाशिक - पुणे महामार्गाला जोडणार हा महत्त्वाचा लिंक रोड आहे. हा रस्ता इंदिरानगर बोगद्यापासून साईनाथ नगर सिग्नल, अशोका हॉस्पिटल रोड, डीजीपीनगर व पुणे रोड असा आहे. या रोडच्या रुंदीकरणासह रोडच्या मध्यभागी दुभाजक, दोन्ही बाजूला फुटपाथ, स्टॉर्म वॉटर लाईन यासह विविध कामे करण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूला दोन लेनचा रस्ता तयार होणार आहे. यासाठी सुमारे ३० कोटी खर्च अपेक्षित असून ३० मीटरचा रोड येत्या वर्षभरात साकारला जाईल. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या वाहनांना सिडकोहून द्वारकापर्यत येण्याची गरज राहणार नाही. त्याऐवजी इंदिरानगर येथील बोगद्यापासून वाहनधारक या रस्त्याने पुणे महामार्गावर फेम चित्रपट गृहाजवळ जाता येणार आहे. त्यामुळे त्यांची द्वारका येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका होऊन त्यांच्या वेळेची बचतदेखील होणार आहे

हेही वाचा: भोंग्यावरून राजकारण चालणार नाही : मंत्री अस्लम शेख

Web Title: 30 Crore Rupees Road To Be Constructed In Ex Mayor Satish Kulkarnis Ward Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top