nmc property tax latest marathi news
nmc property tax latest marathi newsesakal

NMC : थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ढोल

नाशिक : एक लाखांपेक्षा अधिक घरपट्टीची (Property Tax) थकबाकी असलेल्या ३२४५ मोठ्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावून १ ऑगस्टपासून विशेष वसुली मोहीम सुरू केली जाणार आहे.

वसुली करताना थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजून कर भरविण्याची दवंडी पिटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर थकबाकी अदा न झाल्यास घरातील टीव्ही फ्रिज जप्त केले जाणार आहे. (3245 final notice to large defaulters Special recovery drive from 1st August NMC Latest Marathi news)

महापालिकेचे (NMC) उत्पन्नात जीएसटी अनुदानापाठोपात घरपट्टीचे उत्पन्न अधिक आहे. घरपट्टी वसूल करताना मात्र गेल्या दोन वर्षांपासून अनेक अडचणी येत आहे. पावणेपाच लाख मालमत्ता धारकांपैकी जवळपास ६० टक्के मालमत्ताधारक नियमित कर अदा करतात.

दहा टक्के मालमत्ता धारक असे आहेत, की वर्षानुवर्षे त्यांच्याकडे कराची थकबाकी आहे. घरपट्टी वसुली करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. आगाऊ घरपट्टी अदा केल्यास एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के, तर जून महिन्यात दोन टक्क्यांची सूट दिली जाते.

यंदाही योजना राबविण्यात आली. यातून महापालिकेला ६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, मात्र कायमस्वरूपी मालमत्ता धारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्याकडून मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे विविध विभागाने अशा एक लाख रुपयांपेक्षा थकबाकी असलेल्या थकबाीधारकांकडे मोर्चा वळविताना त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मालमत्ता धारकांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना सूचित केले जाणार आहे. ढोल वाजूनही अशा बडा थकबाकीदारांना जाग न आल्यास त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तू जप्त करून लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

nmc property tax latest marathi news
Nashik : पोलिस आयुक्तालयाकडून शहरात मनाई आदेश लागू

मोठ्या थकबाकीदारांची यादी

एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी विविध कर विभागाने तयार केली आहे.

त्यात ३२४५ थकबाकीदार आढळून आले. पूर्व विभागामध्ये १०१५, पश्चिम विभागात ६४६, नाशिक रोड विभागात ४०५, सातपूर विभागात १९८, सिडको विभागात ३१६, पंचवटी विभागात ६३९ याप्रमाणे थकबाकीदार आढळून आले. या थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती विविध विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

nmc property tax latest marathi news
डबक्यांमुळे डासांचा उच्छाद; धूर फवारणीची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com