Nashik News : 33 लाखांच्या उद्यानाची लागली वाट; अभियत्यांना हार घालून निषेध

शहरातील ठाकरेनगरात असलेल्या उद्यानात गाढव, कुत्रे व प्राण्यांचा मुक्त संचार आहे.
Yuva Sena District Chief Vikram Randhave while garlanding Engineer Ghode with dried flowers regarding the condition of park in Thackeraynagar.
Yuva Sena District Chief Vikram Randhave while garlanding Engineer Ghode with dried flowers regarding the condition of park in Thackeraynagar.esakal

Nashik News : शहरातील ठाकरेनगरात असलेल्या उद्यानात गाढव, कुत्रे व प्राण्यांचा मुक्त संचार आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या निधीतून ३३ लाख रुपये खर्चून बनविलेल्या उद्यानाची वाट लागली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

यामुळे उद्यानाचे काम म्हणजे जनतेची फसवणूक व मातीमोल आहे. (33 lakh rupees park It has been ignored by Public Works Department nashik news)

त्यामुळे अभियंता प्रकाश घोडे यांना सुकलेल्या फुलांचा हार घालून निषेध करण्यात आला. याबाबत आमदारांचे सहाय्यक घोलप यांना वारंवार सांगूनही या कामाकडे दुर्लक्ष झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश घोडे व पठारे यांना ठेकेदार कोण हे माहीत नसताना १६ लाख रुपयांचे बिल काढण्यात आले.

त्यातून जनतेपेक्षा ‘ठेकेदार’ हेच दाखवून दिले. निकृष्ट दर्जाचे काम करूनही ठेकेदार फिरायला तयार नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी अभियंता प्रकाश घोडे यांना सुकलेल्या फुलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. त्यांनी एक महिन्यात काम पूर्ण करण्याचा शब्द दिला.

Yuva Sena District Chief Vikram Randhave while garlanding Engineer Ghode with dried flowers regarding the condition of park in Thackeraynagar.
Nashik News : प्राचार्यांसाठी विद्यार्थ्यांचे अन्नत्याग; स्कूलमध्ये दिवसभर ठिय्या

एक महिन्यात काम पूर्ण न केल्यास अभियंता यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा श्री. रंधवे यांनी दिला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, मोहन पाटील, मीरा जाधव, सौ. भडकवाडे, कापडी, कादरी, पाटील, पटेल, प्रभागातील महिला व नागरिक उपस्थित होते.

''निफाड शहरातील महत्त्वाचा भाग असलेल्या ठाकरेनगरमध्ये आमदार निधीतून 33 लाख रुपये खर्चून उद्यानाची निर्मिती केली. मात्र, या उद्यानाची पुरती वाट लागली आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. संबंधितांना वारंवार सांगूनही सुधारणा होत नसल्याने अभियंत्यांना जाब विचारला. सुधारणा झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.''-विक्रम रंधवे, युवासेना, जिल्हाध्यक्ष

Yuva Sena District Chief Vikram Randhave while garlanding Engineer Ghode with dried flowers regarding the condition of park in Thackeraynagar.
Nashik News : प्राचार्यांसाठी विद्यार्थ्यांचे अन्नत्याग; स्कूलमध्ये दिवसभर ठिय्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com