Latest Marathi News | बिबट्याच्या हल्ल्यात 350 कोंबड्यांचा मृत्यू; किकवारी बुद्रुक येथील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poultry farm net broken by leopard.

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 350 कोंबड्यांचा मृत्यू; किकवारी बुद्रुक येथील घटना

किकवारी बुद्रुक (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीवर शनिवारी (ता. १८) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी भास्कर अहिरे यांच्या पोल्ट्री फार्ममधील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (350 chickens killed in leopard attack Incident at Kikwari Budruk Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Video Viral : नाशिकमध्ये चौघांना उडवणाऱ्या मद्यधुंद कारचालकाला पकडतानाचा थरार CCTVत कैद

किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीलगत अहिरे यांचे शेत आहे. गट नंबर २५१ मध्ये त्यांचे पोल्ट्री फार्मचे शेड असून, पाच हजार कोंबड्या आहेत. शनिवारी रात्री बिबट्याने पोल्ट्री शेडची जाळी वाकवून तीनशे ते साडेतीनशे कोंबड्यांना लक्ष्य केले. भास्कर अहिरे पहाटे कोंबड्यांना खाद्य टाकायला गेले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असून, शेतकरी भयभीत झाले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर निघणेही अवघड झाले आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी भास्कर अहिरे व शेतकऱ्यांनी केली आहे.

"किकवारी बुद्रुक येथील वाघदर वस्तीजवळ शेत असून, त्यात पाच हजार पक्षी होते. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने पोल्ट्रीची जाळी वाकवून तीनशे ते साडेतीनशे कोंबड्यांना लक्ष्य केले."
- भास्कर अहिरे, शेतकरी, किकवारी

हेही वाचा: Nashik : ‘बॉयफ्रेंड’ च्या वादातून विद्यार्थिनींची फ्रीस्‍टाईल; पोलिसांकडून समज

टॅग्स :NashikattackLeopard