येवल्यात सहा महिन्यांत फक्त ३८ हजार नागरिकांचे लसीकरण

Corona Vaccination
Corona Vaccination sakal media

येवला (जि. नाशिक) : तालुक्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले खरे परंतु सहा महिने उलटल्यानंतर लसीकरणाचा आकडा दोन्ही डोस मिळून फक्त ४६ हजार ६८३ वरच पोचला आहे, तर पहिला डोस ३७ हजार ९८८ जणांना मिळाला असून, रोजच लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने ही वेळ आली असून, प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून एक ते तीन दिवसच लसीकरण होत आहे. संथगती टाळून वेगाने लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (38 thousand people got corona vaccin in six month in yeola taluka)


४५ वयोगटापुढील लसीकरणासोबत १८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाल्याने पुन्हा गर्दी वाढत आहे. येथील ग्रामीण रुग्णालय व स्वामी मुक्तानंद विद्यालयात रोजच गर्दीमुळे विस्कळितपणा येत असून, अनेक नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहूनही लस न मिळाल्याने रिकाम्या हाती माघारी जाण्याची वेळ येत आहे. लसीकरण सुरू होऊन सहा महिने पूर्ण होतील पण या काळात केवळ ३८ हजार जणांनाच लस मिळाली तेव्हा तालुक्यातील सुमारे तीन लाख नागरिकांचे लसीकरण केव्हा होणार हा प्रश्‍न आहे. आतापर्यंत ४८४ सेशन झाली असून, यामध्ये ४५ ते ६० वर्षांतील १३ हजार ४७० नागरिकांना, तर दुसरा डोस दोन हजार जणांना देण्यात आला आहे.
६० वर्षांवरील १२ हजार ज्येष्ठांना पहिला, तर तीन हजार ३०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४५ वयोगटासाठी पहिला डोस सहा हजार ८१४ जणांना, तर दुसरा डोस ४९ जणांना देण्यात आला. आरोग्य विभागातील ९०२ जणांनी पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस ६९२ जणांनीच घेतला आहे.

Corona Vaccination
नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू


गोंधळ टाळण्यासाठी आता यादी!

शहरातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतीक्षायादी बनविण्याचा पर्याय निवडला आहे. प्रतीक्षायादीत नावनोंदणी केल्यावर नागरिकांना प्रतीक्षायादी क्रमांक असलेले टोकन दिले जाईल. जशी लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात प्रतीक्षायादीतील क्रमानुसार लाभार्थ्यांचे लसीकरण केंद्रावर बोलवून लसीकरण केले जाईल.



-आजपर्यंत लसीकरण
केंद्र - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण
राजापूर - ३,४४५ - ३६३ - ३,८०८
पाटोदा - ५,८९७ - १,४१४ - ७,३११
येवला - ६,८८९ - १,९५५ - ८,८४४
भारम - ४,१४३ - ९२१ - ५,०६४
सावरगाव - ५,८१३ - १,१२० - ६,९३३
मुखेड - ५,८२१ - १,२२४ - ७,०४४
अंदरसूल - ५,९८० - १,६९८ - ७,६७८
एकूण - ३७,९८८ - ८,६९५ - ४६,६८३

Corona Vaccination
मालेगावात लुटीच्या उद्देशाने पिक-अपवर गोळीबार; एक जखमी



ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची मागणी होत आहे. आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांत लसीकरण कॅम्प घेतल्याने अनेकांची गैरसोय टळली. आता असे कॅम्प गावोगावी घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देत तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे लसीकरणला वेग द्यावा.
- प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com