Nashik News : बागलाण तालुक्यात सरपंचपद अन् सदस्यपदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल!

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election esakal

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (ता.२) थेट सरपंच पदासाठी १६२ अर्ज तर ४१ ग्रामपंचायतीच्या १३९ प्रभागातील ३८७ जागांसाठी ७९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (Baglan taluka Nashik Latest Marathi News)

सर्वसाधारण प्रवर्ग असलेल्या तळवाडे भामेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी सर्वाधिक आठ उमेदवारी अर्ज तर जायखेडा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी सहा प्रभागातून सर्वाधिक ५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मळगाव खुर्द, किकवारी बुद्रूक, देवठाण दिगर, महड, ढोलबारे, जाखोड, टेंभे वरचे, वाघंबा, डोंगरेज, गोळवाड व माळीवाडे ग्रामपंचायतींचे सर्वात कमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायतींची बिनविरोध होण्याची शक्यता आहे. देवठाण दिगर ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी ५ तर मळगाव खुर्दच्या ७ जागांसाठी ६ अर्ज दाखल झाल्याने उर्वरित जागा रिक्त राहणार आहेत.

थेट सरपंचपदासाठी दाखल अर्ज

पिंपळकोठे (२), मुंजवाड (३), माळीवाडे (6), चौंधाणे (४), चौगाव (५), डांगसौंदाणे (३), तिळवण (३), आराई (७), आसखेडा (७), जायखेडा (५), वनोली (३), गोळवाड (५), टेंभे खालचे (३), कातरवेल (४), तळवाडे दिगर (२), मुंगसे (३), विरगाव (२), भिमखेत (३), किकवारी बुद्रूक (२), वटार (४), तांदुळवाडी (६), मुल्हेर (३), मेारेनगर (५), मळगाव तिळवण (६), मळगाव खुर्द (४), डोंगरेज (६), खिरमाणी (५), निकवेल (३), आव्हाटी (३), औंदाणे (४), आनंदपुर (३), वाघंबा (२), वाघळे (१), गोराणे (५), तळवाडे भामेर (८), महड (२), देवठाण दिगर (२), टेंभे वरचे (३), मानुर (५), जाखोड (९), ढोलबारे (१).

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Gram Panchayat Election
Nashik News : Rifle shooting राष्ट्रीय स्पर्धेत संकेतची नेत्रदीपक कामगिरी

सदस्य पदासाठी दाखल अर्ज

पिंपळकोठे (२१), मुंजवाड (३४), माळीवाडे (१२), चौंधाणे (२६), चौगाव (२९), डांगसौंदाणे (३७), तिळवण (२९), आराई (३७), आसखेडा (२२), जायखेडा (५४), वनोली (१५), गोळवाड (१०), टेंभे खालचे (१३), कातरवेल (१४), तळवाडे दिगर (१६), मुंगसे (१६), वीरगाव (२७), भिमखेत (१३), किकवारी बुद्रूक (११), वटार (२५), तांदूळवाडी (१९), मुल्हेर (३७), मेारेनगर (३४), मळगाव तिळवण (१६), मळगाव खुर्द (६), डोंगरेज (१२), खिरमाणी (१६), निकवेल (१८), आव्हाटी (१५), औंदाणे (१४), आनंदपूर (१७), वाघंबा (१३), वाघळे (१०), गोराणे (१७), तळवाडे भामेर (१९), महड (९), देवठाण दिगर (५), टेंभे वरचे (१०), मानुर (३१), जाखोड (१२), ढोलबारे (७).

अर्ज भरण्यास मुदतवाढ

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना पडताळणी वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या प्रस्तावांची पोहोच पावती उमेदवारी अर्जांसोबत जोडण्याची मोठी धावपळ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी (ता.१) सर्वच उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची निवडणूक आयोगाने सक्ती केली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाउनमुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना रात्र-रात्र जगून काढावी लागत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीचे एक किंवा दोनच उमेदवारी अर्ज भरले जात होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन ऐवजी सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला.

Gram Panchayat Election
Nashik News : भडगाव बारीत वऱ्हाडाच्या बसला अपघात; 2 ठार; 18 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com