Latest Marathi News | Rifle shooting राष्ट्रीय स्पर्धेत संकेतची नेत्रदीपक कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanket Pagar

Nashik News : Rifle shooting राष्ट्रीय स्पर्धेत संकेतची नेत्रदीपक कामगिरी

कळवण (जि. नाशिक) : कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित कळवण महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत पगार याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत ६२१:२ पॉइंट मिळवून भारतीय संघाच्या सहा ट्रायलसाठी दुसऱ्यांचा पात्र ठरला आहे. रायफल शूटिंग प्रकारात संकेतची घौडदौड सुरूच आहे. (Spectacular performance of Sanket in Rifle shooting national competition Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

रायफल शूटर (नेमबाज) असलेला संकेत हा नांदुरी येथील सप्तशृंगी अनाथाश्रमाचे संयोजक गंगा पगार यांचा मुलगा आहे. मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा माजी विद्यार्थी आणि सध्या कळवण महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या संकेत गेल्या सात वर्षापासून रायपूर शूटिंगचा सराव करत आहे. तो रायपूर शूटिंगचा सराव दिल्ली व मुंबई येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

रा‌यफल स्पर्धेत पाच पेक्षा जास्त वेळेस संकेतची निवड झाली असून देशातील महाराष्ट्र गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यात राष्ट्रीय स्पर्धा संकेतने गाजवले आहेत. संकेतच्या यशाबद्दल कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, सरचिटणीस भूषण पगार, उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार सर्व विश्वस्त प्राचार्य डॉ. बी.एस. पगार आदींनी स्वागत केले.

टॅग्स :Nashiksportsrifle