
Animal Care : देव तारी त्याला कोण मारी! आईचे छत्र हरपलेल्या कोल्ह्याच्या पिलांचे होतेय उचित संगोपन
विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : दिनांक ९ फेब्रुवारी गुरुवार रोजी निफाड येथील कोळगाव येथे कोल्हा (fox) मादी अन्न शोधात असताना विहरीत पडून मृत्यूमुखी झाली असून तिची चार पिलं उपाशी असून आई विना त्यांचं संगोपन कसं होईल असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. (4 fox cubs were rescued give custody to Eco Rescue Division nashik news)
इव्हल्याश्या पिलांच्या आईच्या अश्या मृत्यूने सर्वांचं मन हेलावून टाकलं होत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाचे अधिकारी सुजित नेवसे (वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वन सवरक्षक वन्य जीव मनमाड), अक्षय म्हेत्रे, भगवान जाधव, वनपाल मनमाड, पंकज नागपूरे यांनी घटनास्थळी धाव घेत या चारही कोल्ह्याच्या पिलांना ताब्यात घेऊन यांच्या
संगोपणासाठी तत्पर इको व रेस्क्यू नाशिक डिव्हिजन या संस्थाशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा हुबेहूब प्रत्यय येथे पाहावयास मिळाला आहे.
आज मितीस इको इको व रेस्क्यू नाशिक डिव्हिजन चे अभिजित महाले, पशु चिकित्सक डॉ. कल्याणी ठाकूर, सागर पाटील व विशेषतः सध्य स्थितीत त्या कोल्ह्याच्या पिलांच्या आईची जागा समर्थ महाजन यांनी घेतली असून त्यांचं संगोपन सुरु झालं आहे.
सागर त्यांच्या वाढीसाठी डोळ्यात तेल घालून देखभाल करत आहे. सागर त्यांच्या जवळ गेल्यानंतर ती पिलं आनंदाने नाचू लागतात, उड्या मारू लागतात जसे त्यांची आईच त्यांना भरवण्यासाठी आली आहे असे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
साधारण एक महिना वय असलेल्या या कोल्ह्यांच्या पिलांमध्ये १ मादा व ३ नर कोल्हे असून यांना नाशिक मध्ये अजून २० दिवस ठेवणार आहेत. ते शारीरिक दृष्ट्या व प्रवासासाठी सक्षम झाल्यानंतर त्यांना वनअधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने पुणे येथे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
"या पिल्लांना काही दिवसानंतर पुणे येथे स्पेस मॅनेजमेंट सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे. नाशिक शहरात स्पेस मॅनेजमेंट साठी जागा नसल्याने पुणे येथे पाठवावे लागेल. ते स्वतः शिकार करायला शिकल्यानंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडता येऊ शकते."- अभिजित महाले (इको इको व रेस्क्यू नाशिक डिव्हिजन)