esakal | नाशिकचे जवान अर्जुन वाळूंज आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Walunj

नाशिकचे जवान अर्जुन वाळूंज आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा

sakal_logo
By
हर्षल गांगुर्डे

गणूर (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील अर्जुन प्रभाकर वाळुंज (वय २७, रा. भरवीर, ता. चांदवड) या जवानाने १९ ऑक्टोबर २०१९ ला अरुणाचल प्रदेशातील टेंगा व्हॅली येथे लष्करी छावणीमध्ये आत्महत्या केली होती. अर्जुन हा पत्नीच्या वैवाहिक वादामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. यानंतर लष्करांतर्गत चौकशी होऊन पत्नीसह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाऊ सागर वाळुंज यांनी दिली. ( 4 persons including his wife booked in connection with suicide of Jawan Arjun Walunj)

या प्रकरणी मृत अर्जुनच्या भावाने अरुणाचल प्रदेशमधील रूपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. लष्कराचा चौकशी अहवाल, अर्जुनचे शेवटचे कॉल संभाषण आणि इतर सर्व पुरावे बघता अरुणाचल प्रदेश पोलिसांनी उत्तम पाटील (सासरे), पूनम पाटील (पत्नी), अमोल पाटील (मेहुणा) व जालिंदर वाघचौरे (साडू) यांच्याविरुद्ध अर्जुनला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा: नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा

काय म्हटले आहे फिर्यादीत?

गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या अर्जात फिर्यादीत सागर यांनी सर्व कैफियत मांडली होती. अतिशय गरीब आणि खडतर परिस्थितीवर मात करून अर्जुन मार्च २०१० मध्ये लष्करात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीत चांगली सुधारणा केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये अर्जुनला लष्करात साहसी व उत्कृष्ट कामगिरीमुळे नायक म्हणून प्रमोशनदेखील मिळाले होते. पण, लग्न होताच अर्जुनची पत्नी पूनम क्षुल्लक कारणांवरून नेहमी वादविवाद करत असे, तसेच औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देत असे. पूनम व तिचे नातेवाईक अर्जुनला नेहमी शिवीगाळ व अपमानित करून नेहमी घटस्फोटाची मागणी करत असत. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांत प्रचंड मानसिक छळ करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच अर्जुनने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. याबाबत सर्व पडताळणी झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी केलेल्या गुन्हेगारी कृत्याची त्यांना शिक्षा होऊन अर्जुनला न्याय मिळेल, अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: नाशिक सिक्युरिटी प्रेस चोरी : गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली

loading image