esakal | नाशिक प्रेस चोरी प्रकरण : गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू, पोलीस घटनास्थळी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik press

नाशिक सिक्युरिटी प्रेस चोरी : गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : देशाच्या चलनी नोटा छपाईच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील सुरक्षा व्यवस्था भेदून त्यातून सुमारे 5 लाखाच्या नोटा गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 'सकाळ' मध्ये बातमी आल्यानंतर मुद्रणालयात खळबळ उडाली आहे. आज मंगळवारी (ता.१३) प्रेसचे विधी अधिकारी प्रेसमध्ये धडकले. लागलीच गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.(Nashik-Security-Press-Theft-case-Movements-to-file-case-marathi-news)

गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू

चलार्थपत्र मुद्रणालयातील नोट छपाईच्या कारखान्यातील 500 रुपयाचे 5 लाख मूल्याचें 10 बंडल गहाल झाले आहेत काही दिवसांपासून गोपनीय रित्या प्रेसमध्ये दोन अधिकारी चौकशी समिती नेमली होती मात्र या समितीला काही शोधत आले नाही. या प्रकरणात बरिच दिरंगाई झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस यंत्रणेकडे देण्यात आले आहे. आज जेव्हा मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. चलार्थपत्र मुद्रणालयात देशाचे चलन छापले जाते. वर्षाासाठी 4 ते साडे 4 हजार दशलक्ष नोटा छपाई करणाऱ्या या कारखान्याने नोट छपाईचे अनेक उच्चांक केले आहे. देशातील नोटाबंदी नंतर उद्भवलेल्या चलन टंचाईच्या काळात दिवसरात्र काम करुन ज्या कारखान्याने देशाची कौतुकाची शाबासकी मिळविली. त्याच मुद्रणालयात चोरीचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने प्रेसच्या लौकीकाला धक्का बसला आहे.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट

loading image