नाशिक | ​सोनसाखळी चोरट्याचा 4 वर्षीय चिमुरडीवर हल्ला; सिडकोमधील प्रका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सोनसाखळी चोरट्याचा 4 वर्षीय चिमुरडीवर हल्ला; सिडकोमधील प्रकार

सिडको (नाशिक) : सिडको परिसरासह  शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सिडकोतील हनुमान चौक येथील एका 4 वर्षीय चिमुरडीच्या गळ्यातील  सोन्याचे पेंडल खेचून नेण्याचा प्रयत्न करत धारदार शस्त्राने तिच्या हातावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवनी मयूर पगारे ( ४ रा हनुमान चौक सिडको ) ही सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत असताना पत्ता विचारण्याच्या बहाना ने दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने तिच्या गळ्यातील 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पाण खेचून नेण्याचा प्रयत्न केला तिने विरोध करत संशयित सोनसाखळी चोरट्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी अवनीने आरडाओरड केल्यानंतर चोरट्याने सोन्याचे पेंडल सोडून तेथून पळ काढला, धारदार शस्त्राने वार केल्याने तिच्या हातावर गंभीर जखम झाली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत

हेही वाचा: नाशिक | निफाड तालुक्यात कोरोनाने काढले पुन्हा डोके वर

सोनसाखळी चोर आता महिलांबरोबरच लहान मुलांना देखील आता लक्ष करत आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचे मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे या घटनेने असे दिसून येते की पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कमी झालेला आहे

हेही वाचा: नाशिक : ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

loading image
go to top