नाशिक : ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध | Surat- Chennai Green Field Highway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surat Chennai Greenfield Expressway

नाशिक : ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : प्रस्तावित सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी तालुक्यातील आडगाव, लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी येथील शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध केला असून, मोबदला कसा देणार याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

भूसंपादनाचे नोटिफिकेशन काढण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहे. त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर भूसंपादनाचा मोबदला कसा देणार, याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. नोटिफिकेशन जाहीर करताना जिरायती क्षेत्र दाखविण्यात आले आहे. परंतु, वास्तविक बागायती क्षेत्र असून भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा करण्यात आला. ज्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या जाणार आहेत. त्या महामार्गाला लागून आहेत. त्यामुळे सर्विस रोड, अंडर पास यासंदर्भात काय तरतूद आहे, अशी माहिती मिळावी. संपादित होणाऱ्या अनेक जमिनीमध्ये पोटहिस्सा, आणेवारीप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजणी करून त्यामधील द्राक्षबागा, फळ, झाडे, इमारती, विहीरी, तळे, घर, गोठा, वीजजोडणी खांब यासंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना रोख रक्कम अदा केल्याशिवाय जमिनी ताब्यात देवू नये, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.

हेही वाचा: MPSC: PSI पदासाठी नाशिक केंद्रावरील नियोजित मुलाखती ढकलल्या पुढे

देवस्थानाचाही विरोध

प्रस्तावित भूसंपादनात आडगाव येथील जागृत देवस्थान मनुदेवी मंदिर, पीर मंदिर (धोंडवीर मंदिर) येते. त्याचे भूसंपादन न करता जागेवर विकसित करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या वेळी ॲड. प्रकाश शिंदे, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, विनायक कांडेकर, प्रदीप कांडेकर, तानाजी जाधव, प्रभाकर कांडेकर, भरत जाधव, गणेश ढिकले, अशोक शिंदे, भाऊसाहेब नाठे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : राज्यात सिन्नर दुसरे कचरामुक्त शहर

loading image
go to top