esakal | नाशिक जिल्ह्यात 5 हजार 206 कोरोनामुक्‍त; तर 40 बाधितांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona
नाशिक जिल्ह्यात 5 हजार 206 कोरोनामुक्‍त; तर 40 बाधितांचा मृत्यू
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी (ता.30) जिल्‍ह्‍यात चाळीस बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी सर्वाधिक चोवीस मृत नाशिक शहरातील आहेत. दरम्‍यान तीन हजार 749 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या पाच हजार 206 राहिल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट झाली आहे. सध्या जिल्‍ह्‍यात 40 हजार 816 बाधितांवर उपचार सुरु आहेत.


शुक्रवारी झालेल्‍या चाळीस मृतांमध्ये नाशिक शहरातील चोवीस, नाशिक ग्रामीणमधील चौदा, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक तर जिल्‍हा बाहेरील गिरगाव (मुंबई) ज्‍येष्ठ नागरीक महिलेचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 820, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 821, मालेगावचे 84 आणि जिल्‍हाबाहेरील 24 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 766, नाशिक ग्रामीणमध्ये दोन हजार 289, मालेगावचे 71, जिल्‍हा बाहेरील ऐंशी रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..सात हजार 652 अहवाल प्रलंबित

जिल्‍हाभरातील सात हजार 652 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील चार हजार 951, नाशिक शहरातील दोन हजार 240, मालेगावच्‍या 261 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार 187 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी एक हजार 881 रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होती. तेरा रुग्‍ण जिल्‍हा रुग्‍णालयात तर अकरा रुग्‍ण डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 227, मालेगावला 55 रुग्‍ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा