esakal | वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा

बोलून बातमी शोधा

Malegaon Crime News
वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : पोलिस हे सामान्यांच्या रक्षणासाठी काम करतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळाच तर जीवाची परवा न करता ते दिवसरात्र जनतेच्या सेवेत असल्याचे आपण पाहातो. मात्र मालेगावात पोलिस ठाण्यातच पोलिसाच्या कानशिलात लगवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मालेगाव येथील तालुका पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या संशयिताशी लॉकअप गार्डवर ड्यूटीसाठी असलेल्या पोलिसाची परवानगी न घेता बोलताना हटकले. एवढ्यावर दोघांनी पोलिस शिपायाच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २९) सायंकाळी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

नेमके काय घडले?

पोलिस शिपाई तानाजी शिंदे तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअप गार्डवर होते. या वेळी लॉकअपमधील खुनाच्या प्रयत्नातील संशयिताला कैलास शिंदे, गणेश शिंदे (दोघे रा. शेंदुर्णी) भेटण्यासाठी गेले. दोघांनी शिंदे यांची परवानगी न घेता ते कोठडीतील संशयितांशी बोलू लागले. शिंदे यांनी त्यांना हटकत संशयितांना भेटता येणार नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्याने कैलास व गणेश यांनी शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडून झटापट केली. एकाने थेट डाव्या कानशिलात लगावली. शिंदे यांच्या तक्रारीवरून कैलास शिंदे, गणेश शिंदे यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत शासकीय कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा: मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये - देवेंद्र फडणवीस