Nashik News : पाटबंधारे सेवक पतसंस्थेत 42 लाखांचा अपहार; व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

Office of the credit institution.
Office of the credit institution.esakal

येवला (जि. नाशिक) : येथील पाटबंधारे सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळकृष्ण भोरकडे यांनी संस्थेत तब्बल ४२ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक (Fraud) व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. (42 lakh embezzlement in Patbandhare Sevak Credit Institution nashik news)

येथील सहकारी संस्थातील अशा घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नुकतेच येथील गोल्डमॅन पंकज पारख यांना कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारा प्रकरणी अटक झाली आहे.

गुरुदेवदत्त व जनता नागरी पतसंस्थेत संदर्भातही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. जळगावच्या रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतही येथील ठेवीदारांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. आता पुन्हा एकदा गैरप्रकाराचा गुन्हा दाखल झाल्याने सहकारात चालले तरी काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक धर्मेंद्र झाल्टे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ‘२०१२ ते २०१७ या काळात पाटबंधारे सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस असताना भोरकडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पतसंस्थेत जमा असलेल्या रकमांवर मुदतठेव कर्ज दिल्याच्या नावाखाली दर्शवून किर्दीला नावे बाजूस खोट्या नोंदी केल्या.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Office of the credit institution.
Womens Day : गोदावरीची उद्या होणार महाआरती!

त्या रकमा काढून स्वत:कडे ठेवून घेतल्या. संस्थेच्या बँक चालू खाते क्रमांक २४ वरून बेअरर चेकने रकमा काढून घेऊन स्वतःसाठी वापरल्या. या पतसंस्थेत त्यांनी ४२ लाख ८० हजार रूपयांचा अपहार करून त्या बाबत खोट्या नोंदी करून पतसंस्थेचा विश्वासघात व फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात डिसेंबर २०२१ ला शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्याला पत्र व फिर्याद देऊन गुन्हा नोंद करण्याबाबत कळविले होते. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार करून गुन्हा नोंद करण्याची परवानगी मागितली होती. त्याअनुषंगाने मनमाड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खडांगळे याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान आरोपी फरार असून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Office of the credit institution.
Unseasonal Rain : आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल; सुरगाणा तालुक्यात अवकाळीमुळे चिंता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com