esakal | नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 45 बळी; सहा हजार 137 कोरोनामुक्‍त

बोलून बातमी शोधा

Corona
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 45 बळी; सहा हजार 137 कोरोनामुक्‍त
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या कमी होताना कोरोनामुक्‍त रुग्‍ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. परंतु जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणारी मृत्‍यू अद्यापही जास्‍त असल्‍याने कोरोनाचे सावट कायम आहे. मंगळवारी (ता.4) जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे 45 मृत्‍यू झाले. दिवसभरात सहा हजार 137 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर चार हजार 224 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. सध्या जिल्‍ह्‍यात 34 हजार 053 बाधित उपचार घेत आहेत. (45 Covid Patients Died due to corona in Nashik District)

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 223, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 897, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 36 तर जिल्‍हा बाहेरील 68 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील तीन हजार 373, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 642, मालेगावमधून 34 तर जिल्‍हा बाहेरील 88 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पाच हजार 712 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी तीन हजार 793 अहवाल नाशिक ग्रामीण, एक हजार 507 अहवाल नाशिक शहर तर मालेगावच्‍या 412 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार 158 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी चार हजार 839 रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. तर जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सतरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 239, मालेगावमधील 59 रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला

मालेगाव तालुक्‍यातील आठ बाधितांचा समावेश

मंगळवारी कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सोळा, नाशिक ग्रामणमधील पंचवीस, मालेगाव महापालिका क्षेत्रातील चौघांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात गणेशवाडीतील 38 वर्षीय महिलेसह पुष्पावती हिरे नगर, समर्थनगर, हिम्‍मतनगर येथील मृतांचा समावेश आहे. तर मालेगावच्‍या ग्रामीणभागात कुकाणे, अंबासन, पोहहाने, साकुरी निंबायती येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर तालुक्‍यातील सात, चांदवडमधील चार, नाशिक तालुक्‍यातील पळसे व भगुरमधील प्रत्‍येकी एकाचा मृत्‍यू झाला आहे. निफाड, सटाणा, नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दगावले. देवळा व येवला तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला.

45 Covid Patients Died due to corona in Nashik District

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!