Nashik News : इंदिरानगर, राणेनगर बोगद्याच्या लांबीसाठी 47 कोटी; खासदार गोडसे

MP Hemant Godse
MP Hemant Godseesakal

नाशिक : शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर भागातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली असून, ४७ कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्राकडे केलेल्या मागणीला मान्यता मिळाल्याने इंदिरानगर व राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची १५ मीटरने लांबी वाढणार आहे. (47 crores for length of Indira Nagar Rane Nagar tunnel MP hemant Godse Nashik News)

राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक मुंबई महामार्गावर आहेत. सिडको आणि शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत. बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगद्यांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड आहेत.

शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ- सायंकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. तासनतास बोगदे परिसरातील वाहतुकीच्या कोंडीत वाहने अडकून पडत असतात.

यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होत असते.परिणामी वाहनधारकांची मोठी कुंचबणा होत असते. या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

MP Hemant Godse
Market Committee Election : उमेदवारीसाठी आर्थिक सक्षमता हवीच! बनकर-कदम गटाकडे इच्छुकांची लॉबिंग सुरू

राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे शिवारात वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा प्रस्ताव खासदार गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करून घेत, मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला होता.

तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इगतपुरीला आले असता त्यांनी वरील बोगद्याच्या कामाच्या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने बोगद्यांची लांबी वाढविण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून प्रस्तावाची २०२३-२४ च्या एनएच (ओ) यादीत समावेश केला आहे.

आजमितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी २५ मीटर इतकी असून आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात ते आठ मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता २५ मीटरच्या ऐवजी ४० मीटर इतकी होणार आहे. या कामी सुमारे ४७ कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे. बोगद्याच्या वरील महामार्गावर अप आणि डाऊनसाठी रॅम्प असणार आहे.

MP Hemant Godse
Fuel transportation Strike : इंधन वाहतूक होणार ठप्प; वाहतूकदारांकडून अचानक संप!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com