Nashik News: पर्यटन विकास योजनेअंतर्गत निफाड तालुक्यासाठी 5 कोटी 50 लाख मंजूर

Dilip Bankar
Dilip Bankaresakal

पिंपळगाव बसवंत : निफाड मतदारसंघातील पर्यटनस्थळांचे रूप पालटणार आहे. येथील शिवसृष्टी स्मारकाला अतिरिक्त तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पाच कोटी ५० लाखांच्या कामांना प्रसासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

(5 crore 50 lakh sanctioned for Niphad Taluka under Tourism Development Scheme Nashik News)

Dilip Bankar
NMC News: गर्दी विकेंद्रीकरणासाठी फेरीवाला झोनची पुनर्रचना! पथविक्रेत्यांचेही फेरसर्वेक्षण

येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुमारे दोन कोटी मंजूर झाले. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्याने आमदार बनकर यांनी अतिरिक्त तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. आता पाच कोटींची भव्य शिवसृष्टी उभी राहणार आहे.

मौजे सुकेणे येथील श्रीदत्त मंदिर परिसर सुशोभीकरण १ कोटी, विनता-कादवा संगम परिसरात संरक्षण तट व घाट बांधणे १ कोटी, करंजगाव येथील महानुभाव आश्रमात भक्तनिवास उभारणे ५० लाख, असा सुमारे ५ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Dilip Bankar
Nashik News: ओबीसी आरक्षण बचावासाठी राजापूरला साखळी उपोषण सुरू; सकल ओबीसी समाजाचे पहिले आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com