
Nashik News : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवलामधील शिवसृष्टीच्या उर्वरित विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे शिवसृष्टीचे सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार आहे. (5 crore sanctioned for remaining work of Shiv Srushti project nashik news)
श्री. भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधी अंतर्गत २ कोटी रुपये व प्रादेशिक पर्यटन विभागाकडून ४ कोटी असे एकूण ६ कोटीचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला असून प्रकल्पाचे काम देखील सुरु आहे. या प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील प्रतिकृती असलेल्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे काम कुडाळ येथे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनात बसविण्यात आलेले पुतळे ज्या कारागिरांनी घडविले. त्यांच्याच हातून हा पुतळा बनविला जात आहे.
आता या प्रकल्पातील उर्वरित कामासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेच्या माध्यमातून पुन्हा ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातून राहिलेली कामे पूर्ण होऊन लवकरच हा शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होणार आहे.
शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील प्रतिकृती असलेला सिंहासनाधिष्टीत पुतळा, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित म्युरल्स, आरसीसी गॅलरी, म्युझियम, कॅफेटेरीया, आरसीसी बुरुज, ओव्ही हॉल, पर्यटन सुविधा केंद्र, विक्री केंद्र, इतर आनुषंगिक पुतळे, स्वच्छतागृह, लॅडस्केपिंग, गार्डनिंग, पेंटीग्ज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, अग्नीप्रतिबंधक यंत्रणा, इलेक्ट्रीक कामे, सुशोभीकरणाची कामे या कामांचा यात समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.