Nashik Crime News : गोवंश अन् पिक-अपसह 5 लाखांचा ऐवज जप्त

Crime News
Crime Newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील द्याने रिक्षा स्टॉप परिसरात सापळा रचून रमजानपुरा पोलिसांनी शहरात कत्तलीसाठी आणण्यात येणारे पाच गोवंश व दोन बोलेरो पिक-अपसह पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. गोवंश रक्षा समितीचे सदस्य उमेश सूर्यवंशी, विनोद निकम, संदीप पाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. (5 lakhs along with cattle and pickup seized Nashik Latest Marathi News)

Crime News
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; ‘रामतीर्थ'वरील मंदिरांचे जपावे पावित्र्य!

रमजानपुरा पोलिसांनी माहितीची खातरजमा करुन शहरात कुसुंबा रस्त्याने येणाऱ्या विविध वाहनांकडे लक्ष केंद्रीत केले. द्याने रिक्षा स्टॉपजवळ जमादार खैरनार, हवालदार ह्याळीज, पवार, वलगडे, पोलिस शिपाई राहुल जाधव यांनी सापळा रचून बोलेरो पिकअप (एमएच ०४ जीसी ५९२५) व (एमएच ०५ बीएच ७७०८) ही दोन वाहने जप्त केले. यात कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करताना पाच गोवंश मिळून आली.

संशयितांकडे जनावरांच्या खरेदीच्या पावत्या अथवा वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. संशयित कल्पेश लखेसिंग राजपूत व पंकज लखेसिंग राजपूत ( रा. राजपूतवाडा, वाडी बुद्रुक, ता. शिरपूर, जि. धुळे) या दोघा भावांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nashik : उंटवाडीचे Slaughter House वर्षानुवर्षे बंदच!; NMCचा महसूल पाण्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com