Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा

Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा
Sakal
Updated on

Nashik News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तीन दिवसांत जलजीवन मिशनची तब्बल ३५ ते ४० कोटींची बिले काढण्यात आली आहेत. बांधकाम विभागाकडून १५ व्या वित्त आयोग, जनसुविधा, रस्त्यांची १० कोटींची बिले काढण्यात आली आहे.

जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार ४१० कोटींची एक हजार २२२ कामे सुरू आहेत. (50 crore bill for jal jeevan mission construction in 3 days nashik news)

ही कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. ठेकेदारांनी कामे केल्यावर वेळेवर देयके मिळत नसल्याने पुढील काम करण्यावर मर्यादा येत असल्याच्या ठेकेदारांच्या तक्रारी आहेत. तसेच, देयकांच्या फायलींच्या प्रवासाबाबत प्रत्येक जिल्हा परिषदेने वेगवेगळे धोरण असल्याचा त्याचा फटका ठेकेदारांना बसत होता.

अगदी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. या तक्रारी असतानाही झालेल्या कामांच्या बदल्यात बिले काढली जात नव्हती. अनेक कामे ८० टक्के झालेली असताना त्यांना ३० ते ४० टक्के बिले दिली जात होती.

Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा
Nashik Unseasonal Rain: अल्प पावसामुळे ग्रामीण भागात दिवाळीसाठी शांतता! अवकाळी पावसामुळे शेतकरी धस्तावला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कामांची बिले मिळतील की नाही, याबाबत ठेकेदारांमध्ये साशंकता होती; परंतु ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून कामांची बिले काढली आहेत.

कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची सादर झालेली छोटी-मोठी अशी ४० कोटींची बिले विभागाने काढली असल्याचे सांगितले जात आहे. गत तीन दिवसांत तर, १५ ते २० कोटींची बिले काढण्यात आली आहेत. दुसरीकडे बांधकामच्या तिन्ही विभागांकडूनही सादर झालेली बिले काढण्यात आली. साधारण तिन्ही विभाग मिळून १० कोटींची बिले अदा झाली असल्याचा अंदाज आहे. बिले प्राप्त झाल्याने ठेकेदारांची दिवाळी गोड झाली.

Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा
Diwali Rangoli Designs : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनासाठी काढा ‘या’ आकर्षक पिकॉक स्टाईल रांगोळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com