esakal | रघुनाथांनी दगडातून घडविला भविष्यातील ‘सूरज’! कलेचे केले सोने
sakal

बोलून बातमी शोधा

raghunath 124.jpg

निसर्गाने चौसष्ट कलांचे वरदान माणसाला दिले आहे. त्यातील एखादी कला जरी अवगत असेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आधुनिक यंत्राने आकर्षक वस्तू बनविल्या जाण्याच्या हायटेक जमान्यात पिंपळगाव बसवंत येथील रघुनाथ राठोड यांनी मात्र आपल्या कलेचे सोनेच केले आहे.

रघुनाथांनी दगडातून घडविला भविष्यातील ‘सूरज’! कलेचे केले सोने

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : निसर्गाने चौसष्ट कलांचे वरदान माणसाला दिले आहे. त्यातील एखादी कला जरी अवगत असेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आधुनिक यंत्राने आकर्षक वस्तू बनविल्या जाण्याच्या हायटेक जमान्यात पिंपळगाव बसवंत येथील रघुनाथ राठोड यांनी मात्र आपल्या कलेचे सोनेच केले आहे.

आपल्या कलेचे केले सोने...

दगडाला आकार देत देवदेवतांच्या आकर्षक मूर्तींसह गृहोपयोगी वस्तू साकारल्या आहेत. ओबडधोबड आकाराच्या दगडातून त्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक मूर्ती घडविल्या आहेत. याच व्यवसायातून त्यांनी मुलगा सूरजला बारावीपर्यंते शिक्षण देऊन उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे. 
पोट भरण्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी लागते. कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची तयारी व जिद्द असलेल्या राजस्थानचा रघुनाथ राठोड हे २० वर्षांपूर्वी पिंपळगाव शहरात सहकुटुंब आले. सोबत येताना सासरे रामनाथ पवार यांच्याकडून पाषाणातील मूर्तीला आकार देण्याची कला अवगत केली. हाती असलेली कला हाच जर आपला व्यवसाय असेल तर तो अधिकच बहरतो.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

अनेकदा घाव चुकला म्हणून बोटाला, हाताला इजा झाली,

रघुनाथांच्या बाबतीत तेच घडले. प्रारंभी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा घाव चुकला म्हणून बोटाला, हाताला इजा झाली, पण हार मानली नाही. रघुनाथ यांचा स्वत:च्या कलेवर विश्‍वास होता. अखेर त्यांनी घडविलेल्या मूर्ती नागरिकांच्या पसंतीस पडू लागल्या अन्‌ त्यांच्या कलेची ख्याती दूरवर पसरली. मारवल, सफेद, काळ्या पाषाणातून श्रीगणेश, दुर्गा, खंडोबा महाराज, महाकाली, हनुमान अशा देवदेवतांच्या मूर्ती ते घडवीत आहे. पिंपळगावच्या महामार्गावरील ओरिएंटल बँकेलगत रघुनाथ दगडावर घणाचा घाव घालताना दिसतात. मूर्तीबरोबरच दगडी जाते, उखळ, खलबत्ता, पाटा-वरंवटा आदी गृहोपयोगी वस्तूही ते बनवितात. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात मदत
मंदिरांमध्ये लागणाऱ्या मूर्ती, पूर्वजांचे पुतळे बनविण्यासाठी राठोड यांच्याकडे मोठी मागणी असते. राठोड यांचा मुलगा सूरज हा देखील वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात मदत करतो. सूरज बारावी विज्ञान शाखेतून ५७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. वडिलांना मदत करताना उच्चशिक्षित होण्याचे त्याचे स्वप्न आहे. 

मी नाही शिकलो पण मुलाला उच्चशिक्षित करून अधिकारी बनविण्याचे स्वप्न आहे. दगडाला आकार देणे ही माझी आवड व उपजीविका आहे. त्यामुळे कष्टाचे काम असले तरी आनंद मिळतो. -रघुनाथ राठोड, कारागीर, पिंपळगाव बसवंत  

 हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड

loading image