Nashik Crime News: सातपूरच्या 50 रोडरोमिओंवर कारवाई

सातपूर परिसरात हुल्लडबाजी करणारे व महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या ५० तरुणांना ताब्यात घेतले.
50 youths who were outside college were detained in Satpur area nashik news
50 youths who were outside college were detained in Satpur area nashik news

Nashik Crime News: विद्यार्थी नसतानाही विनाकारण महाविद्यालय परिसर, तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या तसेच विनाकारण स्टंटबाजी करणाऱ्या ५० रोडरोमिओसह तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील काळात सर्वच शाळा-महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली जाणार असल्याचे (50 youths who were outside college were detained in Satpur area nashik news)

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी सांगितले. सातपूर परिसरात शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

सातपूर परिसरात हुल्लडबाजी करणारे व महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या ५० तरुणांना ताब्यात घेतले. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी असे उद्योग टवाळखोर करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो.

50 youths who were outside college were detained in Satpur area nashik news
Nashik Crime News: पॉलिशच्या बहाण्याने दीड लाखांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाईची मागणी होत होती. या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक श्याम जाधव, बाळासाहेब वाघ, प्रकाश कातकाडे, अश्विनी उबाळे, विलास गिते, यांच्यासह पोलिस कर्मचारी अधिकारी कारवाईत सहभागी झाले होते

50 youths who were outside college were detained in Satpur area nashik news
Nashik Crime News: शहरात आठवड्याभरात साडेनऊ लाखांच्या ऐवजावर डल्ला; घरफोड्या, जबरी चोऱ्यांच्या घटनेत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com