बाजार समितीत 55 टक्के पालेभाज्यांची आवक; पाऊस थांबल्यामुळे आवकेत वाढ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leafy vegetables

बाजार समितीत 55 टक्के पालेभाज्यांची आवक; पाऊस थांबल्यामुळे आवकेत वाढ

पंचवटी : गेल्या चार दिवसांपासून पाऊसाची (Rain) संततधार सुरू होती. रविवारी (ता. १७) पावसाने उसंत घेतली. यामुळे नेहमी होणाऱ्या पालेभाज्या (Leafy Vegetables) आवकेपेक्षा रविवारी ५५ टक्के पालेभाज्या आवक झाली, अशी माहिती बाजार समितीचे लिपिक भानुदास उगले यांनी दिली. (55 percent of arrival of leafy vegetables in market committee nashik Latest Marathi News)

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक शहरालगत असलेले म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद तसेच सुरगाणा, पेठ, करंजाळी, निफाड, सिन्नर तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होत असते. मुंबईसह, अहमदाबादमध्ये नाशिकच्या पालेभाज्यांना मोठी मागणी असते. पावसाची गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू होती.

रविवारी पावसानी उसंत घेतली. मागील आवकेच्या तुलनेत भाजीपाला आवक वाढली असून, ती ५५ टक्के झाली आहे. कोंथिबीरच्या ४० हजार २०० जुड्यांची आवक झाली असून, गावठी कोंथिबीरला किमान १ हजार रुपये, सरासरी तीन हजार पाचशे रुपये, तर सर्वाधिक चार हजार ६५५ रुपये प्रतिशेकडा भाव होता, तर चायना कोंथिबीरला किमान नऊशे रुपये, सरासरी दोन हजार चारशे रुपये, सर्वाधिक चार हजार दोनशे रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला.

हेही वाचा: नाशिक : पूरस्थिती पूर्वपदावर येताच घाटावर वाहने धुण्यासाठी गर्दी

मेथीच्या आठ हजार जुडींची आवक झाली असून, किमान दोन हजार, सरासरी दोन हजार चारशे पन्नास, तर सर्वाधिक तीन हजार नऊशे रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. शेपूच्या सहा हजार पाचशे पन्नास जुडींची आवक झाली.

किमान सातशे, सरासरी सतराशे, सर्वाधिक दोन हजार चारशे पंचावन्न रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. कांदापातच्या सहा हजार चार पन्नास जुडींची आवक झाली. किमान एक हजार, सरासरी तीन हजार दोनशे, सर्वाधिक चार हजार सातशे रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. एकूण पालेभाज्यांपैकी ४० टक्के गुजरात, ४० टक्के मुंबई, तर उर्वरित २० टक्के माल हा लोकलसाठी असतो.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील CORONA ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या 700 पार

Web Title: 55 Percent Of Arrival Of Leafy Vegetables In Market Committee Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top