Nashik ZP News : जि. प. मुख्यालय इमारत दुरुस्तीसाठी 57 लाख

ZP Nashik
ZP Nashikesakal

नाशिक : जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारत दुरुस्तीसाठी बांधकाम विभागांकडून यापूर्वी दोनदा दाखल केलेले प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर, तिसऱ्यांदा दाखल झालेला ५७ लाख रुपयांचा इमारत दुरूस्तींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

या निधीतून इमारतींच्या तात्पुरत्या दुरुस्त्या केल्या जाणार आहे. प्रामुख्याने रंगरंगोटी, गळती रोखणे आदी कामे केली जाणार आहे. (57 lakhs for repair of headquarters building Nashik ZP News)

जिल्हा परिषदेचे नवीन प्रशासकीय इमारत त्र्यंबकरोडवरील एबीबीसर्कल येथे मंजूर झाली असून त्याचे बांधकामही सुरू आहे. गत दोन वर्षांपासून झालेल्या पावसामुळे मुख्यालयातील इमारतीला मोठी गळती लागली होती. मुख्यालयातील सामान्य प्रशासन विभागाबाहेरील स्लॅबचा काही भागही कोसळला होता.

तर, जुन्या सभागृहाबाहेरील भितींचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना इमारतीची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्याचा निर्णय घेत बांधकाम विभागास प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून इमारतींची पाहणीही केली मात्र, प्रत्यक्षात प्रस्ताव दाखल झाला नव्हता. त्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला. पहिल्यांदा दाखल झालेल्या प्रस्तावात दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटींची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ZP Nashik
Sundarnarayan Mandir : प्राचीन श्री सुंदरनारायण मंदिराचे अखेर झाले कलशारोहन! पाहा Photos

त्यावेळी लेखा व वित्त विभागाने हा प्रस्ताव फेटाळत महत्त्वाच्या दुरुस्त्या कराव्यात, असे सुचविले होते. त्यानुसार पुन्हा नव्याने ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यात इमारतीची गळती रोखणे, इमारतीस रंगरंगोटी करणे आदी कामांसाठी ६० लाख रुपये तर, रावसाहेब थोरात सभागृह दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती.

मात्र, या प्रस्तावात त्रुटी दाखवत, महत्त्वाच्या दुरुस्त्यांसाठी निधी देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. त्यानुसार ८५ लाख रुपयांच्या प्रस्तावात कमी करत ५७ लाख रुपयांच्या दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने मुख्यालयातील इमारतींची दुरुस्ती होणार आहे.

ZP Nashik
Anant Gite | ......मुळे शिंदे सरकारही पडेल : अनंत गिते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com