Anant Gite | ......मुळे शिंदे सरकारही पडेल : अनंत गिते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Office bearers and activists welcoming Anant Gite and his colleagues

Anant Gite | ......मुळे शिंदे सरकारही पडेल : अनंत गिते

धुळे : राज्यात शिवसेना संपविण्यासाठीच सत्तेचा प्रयोग झाला. यात भाजपमुळे शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे भाकीत करताना शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत

गिते यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांना मातीत गाडा, असे आवाहन शिवगर्जना अभियानांतर्गत येथील शिवसैनिकांना केले. (anant gite statement about shinde Govt dhule news)

शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे राज्यात शिवगर्जना अभियान सुरू झाले आहे. त्याच्या दुसऱ्या‍ दिवशी सोमवारी (ता. २७) शहरात शिवसैनिकांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. नंतर राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात कार्यकर्ता मेळावा झाला.

श्री. गिते यांनी मार्गदर्शन केले. पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हा महिला संपर्कप्रमुख उषा मराठे, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

गद्दारांना धडा शिकवा

श्री. गिते म्हणाले, की राज्याच्या राजकारणात ज्यांना राजकीय वारसा नव्हता, अशा उपेक्षित वर्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी चेहरा दिला. पानटपरी चालविणाऱ्यापासून रिक्षाचालकापर्यंतच्या सामान्यांना सत्तेच्या शिखरावर बसविले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मात्र, त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर २५ वर्षे ज्यांना राज्याच्या कान्याकोपऱ्यापर्यंत शिवसेनेने सत्ता बहाल केली, अशा अविश्‍वासू भारतीय जनता पक्षाच्या नादी लागून शिवसेनेमध्ये बंडखोरी करत ५३ गद्दार बाहेर पडले. राज्य विकासाऐवजी त्यांना सांभाळण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप राबवीत आहे.

गद्दारांना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अद्दल घडविण्यासाठी शिवगर्जना संवाद यात्रा सुरू झाली आहे. सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करा. जनसेवेचे व्रत कायम सुरू ठेवा, अशी साद श्री. गिते यांनी घातली. प्रियंका जोशी, तालुकाप्रमुख नाना वाघ, संपर्कप्रमुख धात्रक, श्रीमती घाडी, श्री. औटी, श्री. सरदेसाई यांनीही मार्गदर्शन केले.

पक्षप्रवेशाचा सोहळा

मेळाव्यात विविध पक्ष-संघटनेच्या प्रतिनिधींचा प्रवेश सोहळा झाला. यात सफाई आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष व वाल्मीकी समाजप्रमुख लक्ष्मण चांगरे, अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद जावडेकर, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश विसनारिया, धुळे शहरातील मुस्लिम समाजाचे जावेद बिल्डर,

भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद शिंदे, देवपूर परिसरातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इरफार मनियार, असगर बाबा, मोहम्मद सलीम अन्सारी, मोहम्मद मेहमूद खान, मोहम्मद सलीम शेख, निवृत्त अभियंता साळुंखे आदींचा समावेश आहे. मेळाव्यापूर्वी युवा सेनेने शक्तिप्रदर्शन करत विविध भागातून मान्यवरांना मेळाव्यास्थळी आणले.

मान्यवरांची उपस्थिती

युवा सेना विभागीय सचिव विलास कवाडिया, विस्तारक शंभू बागूल, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, सहसंपर्कप्रमुख शिंदखेडा ग्रामीण हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा समन्वयक कैलास पाटील, किशोर वाघ, डॉ. भरत राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार,

उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, हिंमत साबळे, शानाभाऊ सोनवणे, परशुराम देवरे, ॲड. पंकज गोरे, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, उपसभापती माधुरी देसले आदी उपस्थित होते. महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी प्रास्ताविक केले. महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन यांनी आभार मानले. जिल्हा युवा अधिकारी हरीश माळी, शहर युवा अधिकारी सिद्धार्थ करनकाळ, कुणाल कानकाटे यांनी संयोजन केले.