जिल्‍ह्यात ५७ पॉझिटिव्‍ह ६० कोरोनामुक्‍त; एक मृत्‍यू | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

नाशिक : जिल्‍ह्यात ५७ पॉझिटिव्‍ह ६० कोरोनामुक्‍त; एक मृत्‍यू

sakal_logo
By
दत्ता लवांडे

नाशिक : बऱ्याच दिवसांनंतर जिल्‍ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने पन्नासचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी (ता.१२) जिल्‍ह्यात ५७ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले.

हेही वाचा: औरंगाबाद : चिंताग्रस्त चेहरे अन् अस्वस्थता

६० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ४५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी नाशिक ग्रामीण भागात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहिली. या क्षेत्रात ३० रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. नाशिक महापालिका क्षेत्रात २७ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

बऱ्याच दिवसांनंतर प्रलंबित अहवालांचा आकडा एक हजाराहून अधिक झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्‍ह्यातील एक हजार १७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ७९८, नाशिक शहरातील १२१, मालेगावच्‍या ९८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५९९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ५९६ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित तिघे रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील आहेत.

loading image
go to top