Rajya Natya Spardha : आभासी प्रतिमांचा पडदा उघडणारे 'बॅलन्स शीट’

Actors of Deepak Mandal presenting scenes from the play 'Balance Sheet' in the State Drama Competition.
Actors of Deepak Mandal presenting scenes from the play 'Balance Sheet' in the State Drama Competition.esakal

नाशिक : धावपळीच्या युगात आभासी प्रतिमांचा खेळ सर्वत्र सुरू असून, त्याला जिवंत माणसांपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे या सर्वांचा परिणाम हा भोवतालच्या परिस्थितीवर जितका होतो, तितकाच आपल्या माणसांच्या मनावरदेखील होतो. याच गंभीर मात्र चिंतन करायला लावणाऱ्या विषयावर भाष्य करणारी नाट्यकृती ‘बॅलन्स शीट’ ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग नाशिकतर्फे सादर करण्यात आली. (61st Rajya Natya Spardha Balance Sheet play Reveals Virtual Images nashik news)

विद्यासागर अध्यापक यांनी या नाटकाचे लेखक केले असून स्वरूप बागूल दिग्दर्शक आहेत. मुंबईतील एका उच्चभ्रू कुटुंबातील तारा, अनंत आणि त्यांचा १५/१६ वर्ष वयाचा एकुलता एक मुलगा या कुटुंबावर आधारित या नाटकाची संहिता पुढे जाते. मोठी शहर, त्यातील माणसाचा पोकळ मोठेपणा आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न, कुटुंबातील सदस्यांमध्ये असणारे आपुलकी, प्रेम अन् जिवंत माणसांपेक्षा आभासी प्रतिमांना दिल जाणार नको तेवढे महत्त्व याची अनुभूती नाटकाच्या संहितेतून प्रकर्षाने जाणवते.

अशी परिस्थिती उद्भवल्यावर माणूस त्यावर काय उत्तर शोधतो याचा प्रत्यक्ष पट प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने आजच्या प्रत्येक पालकांना अंतर्मुख करायला बॅलन्स शीट’ नाटक भाग पाडते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Actors of Deepak Mandal presenting scenes from the play 'Balance Sheet' in the State Drama Competition.
Nashik News : गावगाड्याच्या निवडणुकीने राजकीय कुरघोड्या; गुलाबी थंडीत गावांमध्ये राजकारण तापले

कौस्तुभ एकबोटे, श्रिया जोशी, स्वरूप बागूल, ईशान घोलप, कुंतक गायधनी, अथर्व करमासे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. ऋषिकेश पाटील यांनी केलेले नेपथ्य खऱ्याखुऱ्या बंगल्याची अनुभूती प्रेक्षकांना देत होते. जय खोरे यांनी संगीत, तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना केली. यासह रंगभूषा माणिक कानडे तर वेषभूषा सुखदा गायधनी यांनी साकारल्या.

आजचे नाटक

बुधवारी (ता. १४) वेळ सायंकाळी ७ वाजता बॉश फाईन आर्ट्स, नाशिकतर्फे ‘शीतयुद्ध सदानंद’ हे नाटक सादर होणार आहे. नाटकाचे लेखक श्याम मनोहर असून सचिन शिंदे नाटकाचे दिग्दर्शक आहेत.

Actors of Deepak Mandal presenting scenes from the play 'Balance Sheet' in the State Drama Competition.
Corruption News : घरपट्टी, पाणीपट्टीत ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार; खडकसुकेणेकर एकवटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com