नाशिक : भाजपचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर? NCP नेत्याच्या दाव्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP-BJP

नाशिक : भाजपचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर? चर्चांना ऊत

सिडको (नाशिक) : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर आता पक्षांतराचे वारे वाहू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजपचे (BJP) सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असून ते लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे.

भाजपमध्ये नेमके नाराज कोण...?

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे एकूण सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या एका बड्या नेत्याने खासगीत गप्पा मारताना केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत या नगरसेवकांचा लवकरच पक्ष प्रवेश मोठ्या थाटामाटात व वाजत गाजत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आता नेमके कोण कोण नाराज नगरसेवक प्रवेश घेतात, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. तर इतर पक्षांत जाऊ नये म्हणून भाजपचे बडे नेते मंडळी नेमकी काय भूमिका घेतात, हे बघणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचे (BJP) सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असून ते लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे.

भाजपचे (BJP) सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असून ते लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार; 'या' महिन्यात होणार मतदान

सिडकोतील भाजप नगरसेवक

मुकेश शहाणे, राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, प्रतिभा पवार, अलका आहिरे, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, छाया देवांग यातील कोणत्या नगरसेवकांचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशात लागतो याकडे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे तरी याबाबत यांपैकी एकाही नगरसेवकाने अद्यापपर्यंत मात्र कुठल्याही प्रकारे पक्षांतराबाबत वाच्यता न केल्याचे दिसून आले आहे.

''आमचे जाणार नाही तर आमच्याकडे येणार...''

''भाजप पक्षाचा एकही नगरसेवक सध्या तरी कोणत्याही पक्ष जाण्याची शक्यता नाही. उलट एका मोठ्या पक्षाचे चार नगरसेवक लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आजही भाजप पक्षाची लाट असून येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत- जास्त नगरसेवक निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे.'' - जगन पाटील, सरचिटणीस, भाजप

हेही वाचा: वेतनवाढीचा फरक मिळण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

Web Title: 7 Bjp Corporators Will Join Ncp Nashik Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top