Nashik Crime : 'त्या' प्रकरणातील 7 संशयित ताब्यात | 7 suspects in Koyta gang arrested cidco nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested

Nashik Crime : 'त्या' प्रकरणातील 7 संशयित ताब्यात

Nashik Crime News : पवननगर परिसरातील सप्तशृंगी चौक, स्वामिनारायण चौकात शुक्रवारी (ता.२७) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास टवाळखोरांनी दहशत माजवीत वीस गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविली. (7 suspects in Koyta gang arrested cidco nashik crime news)

याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सात संशयितांना ताब्यात घेतले असून, यातील चार संशयित हे अल्पवयीन आहे. शुभम दादाराव खरात (१९ रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा), रोशन सुभाष मुर्तडक (१९, रा. मखमलाबाद रोड पंचवटी), ओम अनिल चौधरी (१९ रा. साईबाबानगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर यातील एक संशयित अजूनही फरार आहे. सदर प्रकार हा भरवस्तीत घडला असून, पवननगर पोलिस चौकीच्या पाठीमागे घडला असल्याने सिडकोवासीयांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

संशयितांपैकी एक अल्पवयीन हा सावतानगर येथे झालेल्या युवकाच्या खुनाच्या प्रकारात देखिल सहभागी असल्याचा संशय आहे. यामुळे अंबड पोलिसांनी कार्यवाही केली होती.

टॅग्स :Nashikcrimecidco