Nashik Fraud Crime : विमा कंपनीने केले शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान; पोलिसांत गुन्हा दाखल

insurance fraud
insurance fraud esakal

Nashik News : विमा कंपनीने कमी नुकसान दाखवत परस्पर पाहणी अहवाल तयार करून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संबंधित कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधात लासलगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (case has registered in police against officer of insurance company nashik fraud crime news)

याबाबत सविस्तर वृत्त असे ः खेडलेझुंगे येथील शेतकरी रामेश्वर शिंदे व इतर तीन शेतकऱ्यांचे पिकाचे ऑगस्ट २०२२ मध्ये नुकसान झाले होते. त्यांनी पीकविमा काढलेला असल्याने त्यांनी संबंधित कंपनीस नुकसानीबाबत कळवले.

प्रधानमंत्री पीक योजना ही शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून राबविली जाते. त्यासाठी एचडीएफसी ॲग्रो कंपनीने ग्लोबल या कंपनीला नाशिक जिल्ह्याचे सर्व्हे करण्याचे काम दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

insurance fraud
Nashik Fraud Crime : बनावट डीडी काढून लाखोंची फसवणूक; नाशिकसह, नगर, पुण्यात टोळीचे कारनामे

मात्र कंपनीचे संदीप पावडे, क्षेत्रीय कर्मचारी सर्वेक्षण अर्क कंपनी, पिंप्री महिपाल, नांदेड यांनी बांधावर न जाता परस्पर विहित नमुन्यातील फॉर्म भरला. त्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात नुकसानीपेक्षा कमी नुकसान दाखवले. त्यावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून शेतकरी व कृषी सहाय्यकाची दिशाभूल केली.

त्यावर कृषी सहाय्यक यांची सही घेऊन संबंधित शेतकरी व कृषी विभागाची फसवणूक केली. दीपक सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.

insurance fraud
Mumbai Crime News: धक्कादायक! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com