Nashik : जिल्हा बँकेतर्फे 387 कोटींचे पीककर्ज 70 टक्के वाटप

NDCC Bank
NDCC Bankesakal

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असताना देखील यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये (Kharif Season) जिल्हा सहकारी बँकेकडून (NDCC) १२ जुलै अखेर जिल्ह्यातील सभासदांना ३८७ कोटी रुपयांचे पीककर्ज (Crop Loan) देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ४२ हजार २९६ शेतकरी सभासद यांना आतापर्यंत कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.

एकूण उदिष्टांपैकी जिल्हा बँकेने ७० टक्के पीककर्जाचे वाटप पूर्ण केले आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारी असताना देखील बँकेने ह्या तारखेपर्यंत ३८४ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले होते. (70 percent distribution of crop loans of 387 crores by District Bank Nashik Latest Marathi News)

खरीप हंगाम हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा हंगाम असतो. त्यामुळे दरवर्षी खरीप हंगामामध्ये पिकासाठी शेतकऱ्यांना शिखर बँकेतर्फे राष्ट्रीय, खासगी, जिल्हा व ग्रामीण बँकांकडून पीककर्जाचे वाटप हे केले जात असते.

त्यासाठी शासनाकडून प्रत्येक बँकेस उदिष्ट ठरवून दिले जाते. चालू खरीप हंगामामध्ये जिल्हा सहकारी बँकेस खरीप व रब्बी हंगाम धरुन ५७९ कोटी २४ लाख रुपयांचे उदिष्ट ठरवून देण्यात आले होते.

मागील अनेक वर्षापासून बँक आर्थिक अडचणी असून बँकेच्या थकबाकीचे प्रमाण ८६ तर कर्जाचे प्रमाण ६८ टक्के असताना देखील खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण होवू नये म्हणून बँकेकडून एक एप्रिल २०२२ पासून सभासदांना पीककर्ज वाटपास सुरवात करण्यात आली होती.

१२ जुलै अखेर नाशिक जिल्हा बँकेने ४२ हजार २९६ शेतकऱ्यांना ३८७ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. प्रती शेतकरी सरासरी ९१ हजार रुपये कर्जवाटप केले आहे. यामुळे बँकेने मिळालेल्या उदिष्टांच्या एकूण ७० टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे.

NDCC Bank
Crime Update : आई-बापाला मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार

कर्ज वाटपात जिल्हा बँक अग्रेसर

खरीप हंगामामध्ये पीककर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेने खासगी व राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सरसच आहे. जिल्हा बँकेने ७० टक्के कर्ज वाटप केले आहे.तर राष्ट्रीयकृत बँकेने ३७ टक्के (२६ हजार ६९० सभासद) शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले असून प्रती शेतकरी सरासरी २ लाख ६४ हजार कर्ज वाटप केलेले आहे.

यात खास करून राष्ट्रीय बँकांनी मोठ्या व बागाईतदार शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. खासगी बँकांनी २६ टक्के कर्जवाटप केले असले तरी जिल्हाभरात ४ हजार २८३ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले असून प्रती शेतकरी २ लाख ९० हजार रुपये कर्ज वाटप केले आहे.

ग्रामीण बँकांनी कर्जवाटप ७४ टक्के (४७२ सभासद) दिसत असले तरी या बँकेना कर्जवाटप उद्दिष्ट फक्त ८ कोटीचे असून त्यापैकी ६ कोटी रुपये पीककर्जापोटी वाटप केलेले आहे. या सर्व बँकांच्या पीककर्ज वाटपामुळे जिल्ह्यात सरासरी ४१ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे.

NDCC Bank
Monsoon Update : राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 9 टक्के अधिक पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com