जिल्ह्यातील तीन समूहांतील 'इतक्या' धरणांत ७० टक्के जलसाठा!

gangapur dam2.jpg
gangapur dam2.jpg
Updated on

नाशिक : धरण क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील २३ पैकी नऊ धरणे भरली आहेत. शनिवारी (ता. २२) नाशिक शहराची तहान भागविणारे गंगापूर धरण ९२ टक्के भरले. त्यामुळे पुढील दोन दिवसांत धरणातून गोदावरीत विसर्ग करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

२३ धरणांत ७० टक्के जलसाठा

जिल्ह्यात २४ तासांत १४ मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यत जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला आहे. पश्‍चिम पट्ट्यात विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. मंगळवारी नक्षत्र बदलले आहे, तेव्हापासून पाऊस अजून जोरात सुरू आहे. गंगापूर धरणात शनिवारी पाच हजार १७३ दशलक्ष घनफूट (९१.८८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या समूहातील चार धरणे असून, त्यात आतापर्यंत ७४ टक्के साठा झाला आहे. 
इगतपुरीत पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने तालुक्यातील एक हजार ६८० दशलक्ष घनफूट क्षमतेचे कडवा धरण ओव्हरफ्लो झाले. 

दारणा समूहात आतापर्यंत (८४ टक्के) जलसाठा

इगतपुरी तालुक्यातील दारणा समूहात दारणा, वालदेवी, भावली, भामनंतर चौथे कडवा धरणही भरले असून, मुकणे व वाकी- खापरी ही दोन्ही धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास पावणेतीन हजार मिमी पाऊस पडला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मुकणे आणि वाकी-खापरी ही दोन्ही धरणे भरतील. १५ हजार ८७३ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या दारणा समूहात आतापर्यंत (८४ टक्के) साठा झाला आहे. 

गिरणा खोऱ्यात पावसाची समाधानकारक स्थिती आहे. गिरणा समूहातील हरणबारी, केळझर, माणिकपुंज अशी तीन धरणे भरली आहेत. १५ हजार ५९० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या समूहात (६८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख चार धरण समूहांतील २३ धरणांत ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुटापैकी ४६ हजार २५३ दशलक्ष घनफूट (७० टक्के) पाणीसाठा आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com