दिंडोरी तालुक्यासाठी ७५ जम्बो सिलिंडर; नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्याला यश

एकाच दिवसात ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
oxygen
oxygenSYSTEM

लखमापूर/वणी (जि. नाशिक) : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढत ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्याकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकाच दिवसात ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे सुपूर्द केली.

काही तासांत ऑक्सिजन सिलिंडर जमा

ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टंचाई भासू लागली होती. याबाबत सर्व डॉक्टरांनी श्री. झिरवाळ यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले होते. त्यानुसार झिरवाळ यांचा वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्यासोबत चर्चा करत उद्योजकांनाही ऑक्सिजन पुरविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनास उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दिंडोरी तहसील कार्यालयात काही तासांत ७५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर जमा झाले असून, ते आता गरजेनुसार हॉस्पिटलला पुरवले जाणार आहेत.

oxygen
शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com