Teachers Transfer: जिल्हयात संवर्ग 4 मध्ये 800 शिक्षक बदलीस पात्र; यादी जाहीर, प्रत्यक्ष बदलीची प्रतीक्षा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher transfer

Teachers Transfer: जिल्हयात संवर्ग 4 मध्ये 800 शिक्षक बदलीस पात्र; यादी जाहीर, प्रत्यक्ष बदलीची प्रतीक्षा!

नाशिक : जिल्हांतर्गत ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग चारच्या शिक्षक बदल्यांची यादी अखेर मंगळवारी (ता.7) प्रसिध्द झाली. यात संवर्ग चारअंतर्गत ७९९ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. आता जिल्हाभरातील १५७१ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.

या प्रक्रियेनंतर विस्थापित होणाऱ्या शिक्षकांसाठी ११ फेब्रुवारीपर्यंत आॅप्शन अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर १२ ते १५ फेब्रुवारी या चार दिवसात या शिक्षकांच्या बदल्या होतील. (800 teachers eligible for transfer in cadre 4 in district List announced waiting for actual replacement nashik news)

प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३१ जानेवारीला ऑनलाइन बदल्या झाल्याच नसल्याने पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

परंतु तांत्रिक अडचणीच्या मुद्द्यावरून बदली प्रकियेला टोलवाटोलवी सुरू होती. राज्यातील संवर्ग ४ मधील सुमारे २१ हजार प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सोमवारी (ता. ६) होणार होती.

परंतु बदली प्रक्रिया राबविणाऱ्या विन्सिस कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बदली प्रक्रिया खोळंबली होती. ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांना कोणते गाव मिळणार, याबाबत निर्णय लागत नसल्याने शिक्षकांचा जीव टांगणीला लागला होता.

अखेर मंगळवारी प्रतिक्षेत असलेली यादी जाहीर झाली. यात संवर्ग चार मधील 799 शिक्षक बदलीस पात्र ठरले आहे. या संवर्गासाठी एकूण 942 शिक्षकांनी अर्ज केले होते. संवर्ग एक अंतर्गत दिव्यांग,गंभीर आजार आदी शिक्षकांची बदली होते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

यात 2140 शिक्षकांनी अर्ज केले होते यातील 348 शिक्षकांची बदली झाली आहे. संवर्ग दोन अंतर्गत पती-पत्नी एकत्रिकरण केले जाते. सद्यस्थितीला ज्या ठिकाणी हे शिक्षक कार्यरत आहेत, त्या ठिकाणाचे अंतर हे 30 किलो मिटरपेक्षा जास्त आहे, अशा 209 शिक्षकांनी अर्ज केले होते.

यातील 201 शिक्षक बदलीला पात्र ठरले आहे. संवर्ग तीन मध्ये बदली करिता 1291 शिक्षकांनी अर्ज केले होते. यात, 223 शिक्षकांची बदली झाली आहे. एकूण चार संवर्गात जिल्हयात 1571 शिक्षक बदलीस पात्र ठरलेले आहे.

यातील विस्थापित झालेल्या शिक्षक बदलीची प्रक्रीया वेळापत्रकाप्रमाणे सुरू होईल. 16 फेब्रुवारी रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी बदली आदेश प्रकाशीत केले जाणार आहे.

टॅग्स :NashikteacherTransfers