
Nashik ZP News : अनुकंपावरील 121 उमेदवारांना उद्या मिळणार पदस्थापनेचे गिफ्ट!
नाशिक : अनुकंपावरील प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेतील १२१ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी पदस्थापनेचे गिफ्ट मिळणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ही पदस्थापना दिली जाणार आहे.
यासाठी अनुकंपधारकांच्या कागदपत्रांची तपासणी गत महिन्यातच झालेली असून अंतिम यादी यादी बनविण्याचे काम बुधवारी (ता.८) काम जिल्हा परिषद प्रशासनाकडून होईल. (121 candidates on Anukampa will get gift of appointment tomorrow Nashik ZP News)
अनुकंपा तत्त्वाची जिल्हा परिषदेत गेल्या चार वर्षांपासून अंमलबजावणी झालेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी नोकरीसाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते.
आता राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर प्रक्रिया गतिमान झाली होती. नाशिक जिल्हा परिषदेने ६३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेत, २ डिसेंबर २०१९ ला उमेदवारांना नियुक्ती आदेश देत पदस्थापना दिल्या.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
त्यानंतर मात्र, कार्यवाही झालीच नाही. अनुकंपाधारकांनी अनेकदा पदे भरण्याची विनंती केली होती. अनुकंपावरील उमेदवार आणि रिक्त जागांचा आढावा घेत, पालकमंत्र्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये बैठक घेतली होती.
बैठकीत जिल्हयातील अनुकंपाधारकांच्या सामायिक यादीनुसार प्राधान्यक्रमावर यादी तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. आचारसंहितेमुळे यादीला विलंब झाला होता, आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचा मुहुर्त साधत पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत गुरूवारी या उमेदवारांना पदस्थापना दिली जाणार आहे.