नाशिक- जिल्ह्यात ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही बालविवाह लावण्याची कु-प्रथा कायम आहे. विशेषत: आदिवासी तालुक्यांत हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ही प्रथा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यात जानेवारीध २०२४ ते एप्रिल २०२५ याकाळात ८९ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश लाभले. दरम्यान, कोठेही बालविवाह सुरु असल्याचे आढळल्यास १०९८ टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.