Crime Update : अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raped news

Crime Update : अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

नाशिक : सिडको परिसरात राहणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या ५६ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडीस आला आहे.

याप्रकरणी संशयित नराधमाविरोधात पोस्को अन्वये बलात्कार, व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यन्वये (ॲट्रोसिटी) अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (9 year old girl was raped nashik Crime Update Latest marathi news)

ज्ञानेश्‍वर त्र्यंबक पाटील (५६, रा. सिडको, नाशिक) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित चिमुरडीला वडील नाहीत. तसेच, संशयित ज्ञानेश्‍वर पाटील हा पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा असून, जवळच राहावयास आहे.

संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीला रस्त्यात एकटीला गाठून अडविले आणि पीडितेच्या राहत्या घराच्या पाठीमागे नेले. त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच, तुला वडील नाहीत. सदरचा प्रकार तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन.

पोलिसांना सांगितले तर घरातील सर्वांना संपवून टाकीन अशी धमकीही दिली. सदरचा प्रकार गेल्या २ ते ५ तारखेच्या दरम्यान घडला. याप्रकाराचा चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने सदरची बाब उघडकीस आली. पीडितेने आईने अंबड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्यानुसार, संशयिताविरोधात पोस्को (बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियम) अन्वये बलात्कार व ॲट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख हे करीत आहेत.