esakal | नाशिकमधील तो काळा दिवस! दिवसभरात ९० बळी

बोलून बातमी शोधा

nashik death rate

नाशिकमधील तो काळा दिवस! दिवसभरात ९० बळी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्‍णालयात दुर्दैवी घटना घडली असताना जिल्ह्यात झालेल्‍या मृत्‍यूंमुळे बुधवार (ता.२१) काळा दिवस ठरला आहे. या घटनेतील मृतांसह जिल्ह्यात एकूण ९० बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जिल्ह्यात कोरोना मृत्‍यूने हाहाकार

जिल्ह्याच्या इतिहासात बुधवारच्‍या दिवसाची काळा दिवस म्‍हणूनच नोंद होणार आहे. शहरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्‍णालयातील दुर्घटनेमुळे रुग्‍णांना जीव गमवावा लागला. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात झालेल्‍या नव्वद मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील ४१ मृत्‍यू झाले असून, यात झाकिर हुसेन रुग्‍णालयात झालेल्‍या २२ मृतांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील ४६, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. जिल्‍हाबाहेरील मुळचे पुणे व नगर येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा नाशिकला उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमधील ४६ मृतांचा समावेश आहे. दिवसभरात सहा हजार २५७ कोरोना बाधित आढळले असून, जिल्ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या ४४ हजार ६६९ वर पोचली आहे.

दिवसभरात ९० बाधितांचा बळी

दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील तीन हजार ७३६, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ३१०, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १३१, जिल्‍हाबाहेरील ८० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ६७७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील तीन हजार ४७७, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ३६८, मालेगावचे ८३२ अहवाल प्रलंबित आहेत. दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार ८२२ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील पाच हजार ४२२ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सात, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३७ रुग्‍ण दाखल आहेत. नाशिक ग्रामीणमधील २८९, मालेगावला ६७ रुग्‍ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

कोरोना मृत्‍यूची भयावह स्‍थिती

- सुरगाणा वगळता मृतांमध्ये प्रत्‍येक तालुक्‍यातील बाधित

- निफाड तालुक्‍यातील सर्वाधिक १६ मृत्‍यू

- चांदवड, दिंडोरी तालुक्‍यांत प्रत्‍येकी सहा बळी

- सटाणा तीन, तर मालेगाव, नांदगाव, कळवण, पेठ, नाशिक तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन रुग्‍णांचा मृत्‍यू

- त्र्यंबकेश्‍वर, येवला, देवळा, इगतपुरी, सिन्नरमधील प्रत्‍येकी एकाचा समावेश

- शहरातही मृतांचा आलेख वाढताच