Nashik News: दारणा धरणात 97, तर मुकणे धरणात 85 टक्के साठा! भात पिकाने बहरले शिवार

A crop of rice standing by the dola. In the second photo, the river is overflowing due to constant currents in Chinchalekhaire area
A crop of rice standing by the dola. In the second photo, the river is overflowing due to constant currents in Chinchalekhaire areaesakal

Nashik News : शहरासह तालुक्यात पावसाचे पुन्हा एकदा समाधानकारक आगमन झाले असून, भात पिकाला संजीवनी मिळाली आहे. सोमवार (ता ११) अखेर तालुक्यात दोन हजार ८९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील सूत्रांनी दिली.

मागील वर्षी याच दिवशी तालुक्यात एकूण चार हजार १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. (97 percent in Darna Dam 85 percent in Mukne Dam Shiwar blooming with paddy crop Nashik News)

दरम्यान, गेल्या १५ ते २० दिवसांपासून तालुक्याच्या सर्वच भागात पावसाने ओढ दिली होती. मात्र, तीन ते चार दिवस सर्वत्र समाधानकारक वृष्टी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यंदा जून महिन्यात तसेच मृग नक्षत्रात दांडी मारणाऱ्या पावसाने जुलै आणि ऑगस्टच्या आर्द्रा, पुर्नवसू, आश्लेषा नक्षत्रामध्ये चौफेर जोरदार फटकेबाजी केली.

यामुळे तळाला गेलेली धरणे भरण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्हाभरात काही ठिकाणी अतिपावसामुळे शेती व पिकांचे नुकसान झाले असले, तरी झालेला पाऊस दिलासा देणारा आहे.

भाताचे आगर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात हंगामाच्या सुरवातीपासून पोषक वातावरण व समाधानकारक पावसामुळे सध्या भात पीक मोठ्या डौलाने बहरले आहे. प्रत्येक वर्षी नवीन वाण येत असल्याने प्रत्येक भागात भात पीक जोमात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A crop of rice standing by the dola. In the second photo, the river is overflowing due to constant currents in Chinchalekhaire area
Nashik News: सुरत-चेन्नई प्रकल्प बाधितांचे समाधान करण्यात अपयश! शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत आमदार आग्रही

आवश्यक प्रमाणात वाढ झाल्याने सध्या भाताचा सुंगध दरवळत आहे. भाताच्या वाणांमध्ये इंद्रायणी, सोनम, आर चोवीस, एक हजार आठ, राधाकृष्ण, फुलेराधा, हाळी, गुजरात थाळी, कर्जत थाळी, बासमती, पंजाब राईस आदी वाणांचा समावेश आहे.

असा आहे धरणनिहाय साठा (सर्व आकडे टक्केवारीत)

दारणा : ९७.१०

भावली : १००

मुकणे : ८५

वालदेवी :१००

कडवा : ९२

गंगापूर : ९५

वाकी : ७४.१६

भाम : १००

A crop of rice standing by the dola. In the second photo, the river is overflowing due to constant currents in Chinchalekhaire area
Nashik: स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणावर गंडांतर; सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव रोजगारांच्या शोधात सासुरवाडीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com