Nashik: निफाड मतदारसंघासाठी 98.16 कोटी मंजूर! रस्ते, पूल, वसतिगृह, विश्रामगृह इमारत बांधकामासाठी निधीची तरतूद

Funding
Fundingesakal

पिंपळगाव बसवंत : हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात रस्ते, पूल, शासकीय वसतिगृह व शासकीय विश्रामगृह इमारत बांधकामासाठी ९८ कोटी १६ लाख निधीची तरतूद झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. (98 crore approved for Niphad constituency Provision of funds for construction of roads bridges hostels rest house buildings Nashik)

निफाड तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी २५ कोटी, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग अंतर्गत मंजूर रस्त्यांसाठी १५.१० कोटी, कादवा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी १५ कोटी, पिंपरी हरिजन वस्ती ते रस्त्यावर पूल बांधकामासाठी १०.५० कोटी,

निफाड येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इमारती बांधकामासाठी १२.३३ कोटी, निफाड येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारती बांधकामासाठी १२.३३ कोटी, पिंपळगाव-आहेरगाव शिरवाडे जोडरस्त्यासह नेत्रावती नदीवर पूल बांधकामासाठी ३.४६ कोटी,

निफाड येथे व पिंपळगाव बसवंत येथे शासकीय विश्रामगृह इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २.२२ कोटी, असे एकूण ९८.१६ कोटींची कामे मंजूर झाली आहेत. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दिलीपर बनकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहेत.

Funding
Nashik Cotton Crop Crisis: पांढऱ्या सोन्यातून 500 कोटींची फसवणूक! पावसाअभावी उत्पादनात 70 टक्के घट

नाशिक-निफाड-येवला- छत्रपती संभाजीनगर या ५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५६० कोटी निधी मंजूर झाला असून, पिंपळस ते नैताळे या साडेतेरा किलोमीटरच्या रस्त्याचा यात समावेश आहे.

"निफाड मतदारसंघाच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी मंजूर करता आला. जनतेला दिलेल्या विकासाच्या शब्दपूर्तीचा हा एक टप्पा आहे. महायुती शासनाच्या माध्यमातून विकासाची गंगा कायम ठेवणार आहे."-दिलीप बनकर, आमदार

Funding
Nashik: खड्ड्यांच्या रस्त्यातून जनतेची सुटका कधी? दिंडोरी-पेठ तालुक्यासाठी निधी मंजूर, पण कामाची प्रतिक्षा कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com