नाशिक जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गासाठी ९९६ हेक्टर भूसंपादन | Surat-Chennai highway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surat Chennai Greenfield Expressway

नाशिक जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गासाठी ९९६ हेक्टर भूसंपादन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : समृद्धी महामार्गानंतर नाशिकच्या दळणवळणाला बूस्ट देण्यात हातभार लागणाऱ्या भारतमालांतर्गत ‘ग्रीनफील्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार सुरत-चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग (Surat-Chennai Greenfield Highway) नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी पुढील महिन्यात अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, जिल्ह्यातील ६०९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी ९९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

नाशिक-सुरत अवघे १७६ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. २०२२ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे २०२४ मध्ये हा महामार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर एक हजार २५० किलोमीटरवर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. हैदराबाद येथील आर्वी असोसिएट्स आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.

ग्रीनफील्ड प्रकल्प

-दीड वर्षात जमीन अधिग्रहण.
-अधिग्रहणानंतर पुढील तीन वर्षांत हायवे कार्यान्वित.
-नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर अंतर.
-९९७ हेक्टर जमीन करावी लागणार अधिग्रहीत.
-सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नरमधून जाणार.
-६९ गावांचा समावेश. दिंडोरीतील सर्वाधिक २३ गावांचा समावेश.
-सिन्नरमधील वावीत समृद्धी एक्स्प्रेसला छेदणार.
-नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी.
-राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश.
-अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक.
-नाशिक ते सोलापूर अंतर ५० किलोमीटरने होणार कमी.

हेही वाचा: नाशिक : जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेस मारहाण; बाळाचा मृत्यू

नाशिकच्या या तालुक्यांतून जाणार मार्ग

सुरगाणा : बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ.
दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहूर.
पेठ : पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.
नाशिक : आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव.
निफाड : चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी.
सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.

हेही वाचा: नाशिक : बस स्थानकात उभ्या शिवशाही बसेसवर दगडफेक

loading image
go to top