esakal | वैद्यकीय विभागाकडून आता पुन्हा नव्याने फेरनिविदाINashik
sakal

बोलून बातमी शोधा

medical exam

वैद्यकीय विभागाकडून आता पुन्हा नव्याने फेरनिविदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या सेवानिवृत्त ६० कर्मचाऱ्यांनी मोफत सेवा पुरवण्यासाठी प्रस्ताव दिला असतानादेखील बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये दोनशे स्वच्छता कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सदरचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने वैद्यकीय विभागाने आता पुन्हा नव्याने फेरनिविदा काढून दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

कोरोनाचे निमित्त करून वैद्यकीय विभागाने महापालिकेचा नवीन बिटको व डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बिटको रुग्णालयात दीडशे, तर झाकिर हुसेन रुग्णालयात पन्नास स्वच्छता कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २० ऑगस्टला झालेल्या महासभेत जादा विषयात प्रस्ताव सादर करण्यात आल्याने जोरदार टीका झाली. प्रस्ताव सादर करताना मोघम पद्धत वापरल्याने वैद्यकीय विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यातही जादा विषयांमध्ये प्रस्ताव घुसल्याने संशय अधिकच बळावला. विशेष म्हणजे सदरचा विषय हा महासभेच्या कार्य मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव खर्चाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी विषय तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, २० सप्टेंबरला झालेल्या महासभेत पुन्हा जादा विषयांमध्ये हा प्रस्ताव असून, त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, सदरचा प्रस्ताव अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवृत्तांच्या प्रस्तावाकडे डोळेझाक

फेरनिविदा काढताना आता वर्षभराऐवजी अवघ्या तीन महिन्यांसाठी काम दिले जाणार आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर परिस्थिती बघून वर्षभरासाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. महापालिकेचे सेवानिवृत्त ६० कर्मचारी मोफत सेवा देण्यास तयार असताना फेरनिविदा काढताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाकडे मात्र पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे.

loading image
go to top