नाशिक : बालकल्याण कार्यालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
kidnaping case
kidnaping caseesakal

नाशिक : उंटवाडी रोडवरील बालकल्याण समिती कार्यालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई नाका पोलिसांत तक्रारदार महिलेच्या फिर्यादीनुसार, उंटवाडी रोडवर बालकल्याण समितीचे कार्यालय आहे. तक्रारदार महिला अल्पवयीन मुलीला या कार्यालयात दाखल करण्यासाठी गुरुवारी (ता. ७) दुपारी आली होती. त्या वेळी कार्यालयात यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्या वेळी कार्यालयात उपस्थित असलेली अल्पवयीन मुलगी तक्रारदार महिलेची नजर चुकवून बाहेर आली आणि अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अज्ञात व्यक्तीरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

kidnaping case
गॅस दरवाढ : नाशिकच्या ग्राहकांना महिन्याला 92 लाखांचा भुर्दंड
kidnaping case
अटी मान्य करा, अन्यथा विनाश करू : पुतीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com