esakal | सामान्यांची लालपरी पुन्हा सुसाट! माहिन्यांत एक लाख ५२ हजार प्रवाशांचा प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

ST

सामान्यांची लालपरी पुन्हा सुसाट!

sakal_logo
By
रवींद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. आता अनलॉकनंतर पुन्हा सुसाट धावू लागली आहे. मागील एक माहिन्यांत कळवण आगारातून जवळपास एक लाख ५२ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने दिली. (about one lakh 52 thousand passengers travel by ST from Kalvan depot in a month)

जिल्ह्यात मागील माहिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्यादेखील घटू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपासून घरीच असलेले नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. एसटी सुरू झाल्यापासून पहिल्या दोन दिवसांत २५ ते ३० फेऱ्या होऊ लागल्या. विभागातील सर्वच आगारातून एसटी धावू लागल्याने शहरी तसेच, ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे. कळवण आगारातून पुणे - ४, औरंगाबाद - २, नाशिक - १४, चाळीसगाव, धुळे, अमळनेर तसेच, देवळा, अभोणा आदी ठिकाणी गाड्या धावत आहेत. दिवसाकाठी पाच हजार प्रवाशी प्रवास करीत असल्याने एसटी महामंडळाला उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर बसची संख्यादेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: नाशिक शहरावर पाणीकपातीचे ढग; पावसाळा लांबल्याने पाणीसाठा कमी

आकडे बोलतात...

एकूण प्रवाशी : १,५२,१०५

एकूण फेऱ्या : २७८५

किमी प्रवास : २,४७,७७९

एकूण उत्पन्न : ६२,१२,११६

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

मागील माहिन्यांपासून निर्बंध शिथिल झाल्यापासून बससेवा पुन्हा नियमितपणे सुरू झाली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. प्रवासांचा प्रतिसाद पाहून बसची संख्या आणखी वाढविण्यात येईल.

- हेमंत पगार, आगारप्रमुख, कळवण

कोरोना नियमांचे पालन…

कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाइझ केली जात आहे. कळवण आगाराच्या पुणे, औरंगाबाद, धुळे, नाशिक त्याचबरोबर इतर मार्गावर बस धावत आहेत. या मार्गावर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(about one lakh 52 thousand passengers travel by ST from Kalvan depot in a month)

loading image