Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal and officials while inspecting the work of Dhulgaon and 17 villages water scheme.
Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal and officials while inspecting the work of Dhulgaon and 17 villages water scheme.esakal

Chhagan Bhujbal: धुळगावसह 17 गावे पाणीयोजनेला गती द्या; छगन भुजबळाच्या अधिकाऱ्यांना सूचना

Chhagan Bhujbal : धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामास अधिक गती देऊन योजनेचे काम जलद गतीने करण्यात यावे.

ही योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी व्यवहार्य कशी राहील यादृष्टीने विकास कामे करण्यात यावी अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. (Accelerate water scheme in 17 villages including Dhulgaon Instructions to officers of Chhagan Bhujbal Nashik)

श्री. भुजबळ यांनी आज तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना दिल्या.

प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपकार्यकारी अभियंता साळुंखे, गटविकास अधिकारी अभिजित पाखरे, सहायक गटविकास अधिकारी अन्सार शेख, भगवान ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या मतदारसंघाला टँकरमुक्त करण्यासाठी भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मतदारसंघात विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तालुका हा दुष्काळमुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. त्यामुळे या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करून नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना त्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal and officials while inspecting the work of Dhulgaon and 17 villages water scheme.
Ramdas Athawale on Chhagan Bhujbal : "... तर राष्ट्रवादी सोडून आरपीआयमध्ये यावं" आठवलेंची भुजबळांना खुली ऑफर

या योजनेसाठी ६३ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाला सुरवातही झाली आहे, त्यानुसार तालुक्यातील पिंपरी येथील गट क्रमांक १३२ व २९१ पैकी ०७ हेक्टर ९२ आर क्षेत्रात धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत साठवण तलाव १ व २ जलशुद्धीकरण केंद्र व आरसीसी जलकुंभ साकारण्यात येत आहे. या कामाची आज भुजबळ यांनी पाहणी केली.

या गावांचा पाणीप्रश्न मिटणार

या योजनेमुळे तालुक्यातील धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिचोंडी बु., चिचोंडी खु., सताळी, बदापूर या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal and officials while inspecting the work of Dhulgaon and 17 villages water scheme.
Maha CET Cell Application : व्‍यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे अपडेट्‌स ‘ॲप’वर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com