नाशिक पेठ महामार्गावर आयशर पिकअपच्या धडकेत 3 ठार, 2 जखमी | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

नाशिक पेठ महामार्गावर आयशर पिकअपच्या धडकेत 3 ठार, 2 जखमी

उमराळे (जि.नाशिक) : गुजरात (Gujrat ) राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावर (Nashik Peth Highway) नाशिककडे गुजरात राज्य कडून येणारी आयशर व चाचडगावकडून जाणारी पिकप यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने चाचडगाव येथील 3 जण ठार 2 जण गंभीर जखमींना 108 रुग्णवाहिकेने नाशिक ग्रामीण रुग्णालयात (Nashik District Rural Hospital ) दाखल केले आहे.

चाचडगाव कडून येणारी पिकअप क्र. (MH-15-AG 937) गुजरात कडून येणारी आयशर ट्रक क्र. (MH-15- PV 8934 ) यांची समोरासमोर धडक झाल्याने चाचडगाव येथील संतोष हिरामण लांडे (वय 25) हेमंत रघुनाथ मोरे (वय 26) कमलेश सुखदेव मोरे (वय 27) जागीच ठार झाले तर लखन भगवान गांगोडे (वय 25) रवींद्र वामन पोटींदे (वय 27) यांना नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात (Nashik District Rural Hospital ) दाखल केले आहे.

सदर घटनेची माहिती दिंडोरी उमराळे बुद्रुक PI (Police Inspector) वाघ पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector ) कावळे धनंजय शीलवटे चाचडगाव पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांना कळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी चाचड गाव येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले नाशिक पेठ महामार्गावर अपघात जबरदस्त होता की पिकप गाडीचा चक्काचूर झाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळे पडले होते यामुळे चाचडगाव गावावर शोककळा पसरली होती पुढील तपास दिंडोरी PI (Police Inspector) व कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीलवटे करीत आहे.