Nashik Accident News : नाशिक- मुंबई महामार्गावर विचित्र अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Accident News

Nashik Accident News : नाशिक- मुंबई महामार्गावर विचित्र अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ बुधवार ( ता. ८ ) दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन ४ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहुन मुंबईकडे जाणारी एसेंट कार एम. एच. 04 एफ. ए. 8291 ही गाडी भरगाव वेगाने जात असतांना गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार थेट उडुन मुंबईहुन नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात एकाच कुटुंबातील लहान १ मुलगी १ महिला व २ पुरुष जागेवर ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतुक विस्कळीत झाली.