esakal | बोरटेंभे रेल्वे पुलावर ट्रकचा अपघात; मोठी दुर्घटना टळली
sakal

बोलून बातमी शोधा

accident on bortembherailway bridge igatpuri disrupted central railway traffic

बोरटेंभे रेल्वे पुलावर ट्रकचा अपघात; मोठी दुर्घटना टळली

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावरील इगतपुरीच्या बोरटेंभे येथील रेल्वेपुलावर गुरुवारी (ता.९) रात्री दोनच्या सुमारास ट्रकला अपघात झाला. या अपघातामुळे ट्रकचा काही भाग रेल्वे पुलाला अधांतरी लटकला आहे. यामुळे रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीचा कठडा तुटून रेल्वे ट्रॅकवर पडला असून, ट्रकचा एक टायरही निसटून पडला आहे. पुलावरून रेल्वे रूळावर ट्रक पडला असता, तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वेची वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.


मुंबई- नाशिक महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमपी ०९, जीएच १६५८) रात्री दोनला अपघात झाला. बोरटेंभे पुलावर रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती समजताच रेल्वेचे दुर्घटना राहत दल, आरपीएफ, लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी ट्रकला बाजूला करण्यात आला. शुक्रवारी (ता. १०) सकाळी सहापासून मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.

हेही वाचा: हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीत एक लाख दुबार नावे

loading image
go to top